अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन, झोपेतच जगाचा घेतला निरोप – Tezzbuzz
सिद्धार्थ मल्होत्रा हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. तर नुकतेच त्याचे वडील सुनील मल्होत्रा याचे निधन झाले आहे, अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची पुष्टी केली आहे,त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार दिल्लीत झाले, परंतु या कठीण काळात तो त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सध्या दिल्लीतच राहणार आहे, अभिनेत्याने सोशल मीडियावर वडिलांसोबतचे आठवणीतील काही फोटो शेअर आहेत. आणि या पोस्टसोबत संदेशही लिहून भावना व्यक्त केले आहेत.
सिद्धार्थने (Sidharth)त्याच्या वडिलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शन लिहले की “ते सत्य, प्रामाणिकपणा आणि संस्कृती जपणारे माणूस होते. ते त्याच्या मूल्यांनुसार आयुष्य जगले, कधीही तडजोड केली नाही. ते शिस्तप्रिय होते, पण कठोर नव्हते. त्याच्याकडे ताकद होती, पण अहंकार कधीच नव्हता. आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले पण ते नेहमीच सकारात्मक राहिले. मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून समुद्राचे नेतृत्व करण्यापासून ते शांत आणि धैर्याने आजाराचा सामना करण्यापर्यंत, त्याने कधीही हार मानली नाही, कधीही त्याची प्रतिष्ठा गमावली नाही.
तो पुढे लिहितो, “बाबा, तुमचा प्रामाणिकपणा हा माझा वारसा आहे. तुमची ताकद मला दररोज मार्गदर्शन करते. तुमची सकारात्मकता अजूनही आमच्या कुटुंबाला एकत्र ठेवते. तुम्ही आम्हाला तुमच्या झोपेत शांतपणे सोडून गेलात, पण तुम्ही मागे टाकलेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. मी आज जो आहे तो तुमच्यामुळे आहे. आणि मी तुमचे नाव, तुमची मूल्ये आणि तुमचा प्रकाश नेहमीच पुढे घेऊन जाईन.
अभिनेता अनेकदा त्याच्या वडिलांबद्दल बोलला आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, “माझे वडील माझे खरे हिरो आहेत, माझे सर्वात प्रिय हिरो आहेत. सिद्धार्थ त्याच्या वडिलांना त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार मानत होता. त्याचे वडील सुनील मल्होत्रा मर्चंट नेव्हीमध्ये माजी कॅप्टन होते. तर सिद्धार्थला त्याचे वडीलच शिस्त आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकवत होते.
सिद्धार्थ मल्होत्राने 2012 मध्ये “स्टुडंट ऑफ द इयर” या चित्रपटातून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनीही भूमिका केल्या होत्या. या नंतर, त्याने एक व्हिलन, मिशन मजनू आणि शेरशाह सारख्या चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः “शेरशाह” मधील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. 2023 मध्ये, अभिनेत्याने कियारा अडवाणीशी लग्न केले आणि 2025 मध्ये त्याना मुलगी झाली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्रसिद्ध अभिनेत्री प्रविणा देशपांडे यांचे निधन, मुंबई मध्ये झाले अंतिम संस्कार
Comments are closed.