कधीही स्वप्नांचा पाठलाग सोडू नका, धुरंदरचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी शेअर केली भावुक पोस्ट – Tezzbuzz
धुरंदर हा चित्रपट प्रचंड गाजला त्यानंतर आता याचा सेकंड पार्ट धुरंदर 2 हा येत आहे हा या चित्रपटाने रिलीजपूर्वी धुमाकूळ घातला आहे. धुरंदर 2 ऍडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली आहे. आदित्य धर यांचा काल 43 वा वाढदिवस होता. अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यामी गौतम तिनेही तिच्या पतीसाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. तर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल आदित्य धर यांनी सोशल मीडियावर आभार मानले आहेत. तसेच चाहत्यांसाठी एक मनापासून संदेशही दिला आहे.
आदित्य धरा (dhar)यांनी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये लिहिले होते, “मी माझा वाढदिवस धुरंधर द रिव्हेंजला अंतिम स्पर्श देत घालवत असताना, गेलेल्या अद्भुत वर्षावर मी विचार करण्यासाठी थोडा वेळ काढत आहे. आज येथे बसून, मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही सर्वांनी माझ्या कामावर दाखवलेल्या विश्वासासाठी. मला तुम्हाला सर्वांना वैयक्तिकरित्या प्रतिसाद द्यायचा आहे, परंतु कृपया तुमच्या सर्व प्रेमाची आणि प्रोत्साहनाची मला किंमत आहे
आदित्यने पुढे लिहिले की तो खरोखर स्वतःला भाग्यवान मानतो आणि कोणत्याही गोष्टीला गृहीत धरत नाही. इंडस्ट्रीमध्ये काहीही निश्चित नसते आणि प्रत्येक चित्रपट हा एक धोकादायक पाऊल असतो. त्याच्यासाठी, प्रेक्षकांचा विश्वास हेच सर्वस्व आहे. जर या वर्षी मला काही शिकवले असेल, तर ते म्हणजे तुमच्या स्वप्नांवरचा विश्वास कधीही गमावू नका, मग ते कितीही मोठे असले तरी. प्रामाणिकपणे काम करा. तुमचे सर्वस्वी प्रयत्न कामांमध्ये द्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सूरज बडजात्याची मुलगी ईशाच्या रिसेप्शनला बॉलिवूड कलाकारांची हजेरी
Comments are closed.