अथर्व सुदामे नंतर आता डॅनी पंडितनेही गणेशोत्सवावर केला हिंदू मुस्लीम ऐक्याचा व्हिडीओ; मात्र यावेळी वेगळ्या प्रतिक्रिया… – Tezzbuzz
पुण्यातील लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर अथर्व सुडेम याने काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा एक रील व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये त्यांनी गणेशमूर्ती बनवणारा मुस्लिम कुटुंबातील व्यक्ती दाखवला व संवादातून “आपण साखरेसारखे असायला पाहिजे…” आणि “आपण वीट व्हावं जी मंदिर आणि मशिद दोन्ही बांधेल येतील…” असा संदेश दिला होता
परंतु, काही लोकांना हा व्हिडिओ वादग्रस्त वाटला; ब्राह्मण महासंघाने त्यावर टीका केली आणि सामाजिक माध्यमांवर त्याला गंभीर प्रतिक्रिया मिळाल्या या प्रकरणामुळे त्यांना धमक्या देखील प्राप्त झाल्या. या तणावामुळे अथर्व सुदामे याने हा रील त्वरित हटवला आणि सार्वजनिकपणे माफीही मागितली. त्याने स्पष्ट केले की, “कोणाच्या भावना दुखवायचा माझा उद्देश नव्हता” आणि जर कोणालाही त्रास झाला असेल तर त्याची मी माफी मागतो.
मात्र आता हा वाद सुरु असतानाच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर डॅनी पंडित याने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात हिंदू–मुस्लिम ऐक्याचा सकारात्मक संदेश प्रभावीरीत्या दाखवण्यात आला. या व्हिडिओला प्रमाणित लोकांनी “हीच आपली संस्कृती” म्हणून स्वागत केले आणि यावेळी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिसला. अनेक वापरकर्त्यांनी यावर कमेंट करत हीच आपली खरी संस्कृती असल्याचे सांगितले.
या व्हिडीओवर अनेक नेते आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी यावर मत मांडताना म्हटले आहे कि, धार्मिक सलोखा आणि बंधुभावाची होळी करुन त्यावर आपल्या स्वार्थाच्या भाकरी शेकणाऱ्यांना अजून एक दणका..! जातीयवाद्यांच्या नाकावर टिच्चून #महाराष्ट्र_धर्माला आणि भागवत संप्रदायाला साजेसा व्हिडीओ केल्याबद्दल शाब्बास आणि Thank U डॅनी…! असं धाडस दाखवणं आज महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.
तर पुणे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रशांत जगताप म्हणतात कि, हाच तो आपल्या समाजातील, आपल्या संस्कृतीतील सलोखा… ज्याची धर्मांध दुष्टांना भीती वाटते. हा सलोखा कायम राहिला तर धर्मांध शक्तींच्या सत्तेचा पाया हलतो. म्हणूनच आपल्यात फूट पाडणे, आपल्या मनात एकमेकांबद्दल राग, द्वेष पेरणे यासाठी ते अहोरात्र काम करतात. त्यांनी कितीही द्वेषाचं पेरू देत, आपण एकमेकांना मानवतेचा मोदक भरवत राहू ! Kudos to Danny Pandit. कलाकार म्हणून तू गुणी आहेसच, पण माणूस म्हणूनही श्रेष्ठ आहेस !
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बहिणीशी होणाऱ्या तुलनेवर बोलली शमिता शेट्टी; आम्ही दोघीही वेगळ्या आहोत…
Comments are closed.