महादेवाची नगरी काशीत पोहोचली अक्षरा सिंग, शिवाला समर्पित केली ‘जोगनिया’ गाणी – Tezzbuzz
भज्जपुरी अभिनेत्री अक्षारा सिंगने (akshara singh) आज मंगळवारी तिचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडिओत ती वाराणसीच्या घाटावर भक्ती मध्ये मग्न झालेली दिसतीये. भाेजपुरी क्वीन अक्षरा सिंह सध्या महादेवा च्या काशी नगरीत आली आहे. आणि बनारसच्या घाटावर बाेटिंगचा आनंद घेत आहे.
अक्षराने सांगितलं कि, तिनं तिचं ‘जोगनिया’ हे गाणं हे नविन अंदाजात बनवून भगवान शंकराला अर्पण केलं आहे. अक्षरा सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाेस्ट केला आहे. त्यात ती बाेटीत बसून वाराणसीच्या घाटांवर शांततेचे सुंदर क्षण एन्जाॅय करत आहे. तिच्या कपाळावर चंदन आहे, गळ्यात आणि डाेक्यावर फुलांच्या माळा घातल्या आहेत. या व्हिडिओ मध्ये तिने आसं लिहिलं की, “ही काशी आहे… इथल्या प्रतेक गाण्यात शिव असतात”.
अक्षराने तिच्या व्हिडिओच्या बैकग्राउंडला तिचं ‘जोगनिया’ हे गाणं लावलं आहे. ती म्हणते, “पहिलांदाच काहीतरी नविन करुन पाहतीये….शिवला एक वेगळ्यारुपात अनुभवून हे गाणं पुन्हा शुट करायला घाटावर आलीये का, ती फिरायला वाराणसीला गेलीये”. अक्षराच्या पाेस्टवर लाेक जाेरात “हर हर महादेव” चा जय जयकार करत आहेत. आणि तिच्या गाण्याची ही खूप तारीफ आहेत .
एकाने कमेंट केली, “गाणं खूप सुंदर आहे, तुमचा आवाज खूप गाेड आहे”. दुसऱ्याने लिहलं, “अक्षरा, संन्यास वगैरे घेऊ नकाेस, अजून तर तू बाॅलीवूडमध्ये धमाकेदार एंट्री करायचीये !” आणि एकाने तर म्हणतलं, “तू दुर्गा मा सारखी दिसतं आहे”. याच बराेबर, अक्षराने तिच्या इंस्टा स्टाेरीवर एक फाेटाे टाकलाय, ज्यावर तिनं लिहिलं, “चमकणाऱ्या क्षणाची काही स्वप्नंही हसत आसतात”.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
गोविंदाच्या बायकोने नावातून कढून टाकले आडनाव ; उत्तर विचारल्यास सांगितले हे कारण…
Comments are closed.