बदलली ‘भूत बंगला’ चीत्रपटाची रिलीज डेट, अक्षय कुमारने अवलंबली धुरंधर 2 सारखी स्ट्रॅटेजी – Tezzbuzz

अक्षय कुमार हा एक लोकप्रिय बॉलीवूड स्टार आहे. जो सध्या त्याच्या आगामी चित्रपट भूत बंगलाठमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारने आतपर्यत उत्तम चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहे. प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. तर भूत बंगला या चित्रपटाच्या रिलीजबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

चित्रपटाचा टीझर आणि गाजलेल्या गाण्यांमुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता आधीच शिगेला पोहोचली आहे. तर या चित्रपटीची रिलीज डेट सुरुवातीला 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होती, पण निर्मात्यांनी आता या चित्रपटाचे प्रदर्शन सहा दिवसांनी पुढे ढकलले आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते, ‘धुरंधर 2’ ची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी आणि त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली सध्याची प्रचंड क्रेझ, या घटकांचा प्रभाव या निर्णयावर दिसून येतो. ‘धुरंधर 2’ ने अवलंबलेल्या रणनीतीचेच अनुकरण करत, हा चित्रपट आता 16 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजल्यापासून आपल्या ‘पेड प्रिव्ह्यूज’ची  हा चित्रपट सुरुवात करेल.

हा चित्रपट अक्षय कुमार (kumar)आणि प्रियदर्शन या जोडीचे बहुप्रतिक्षित पुनरागमन आहे. ही जोडी आपल्या ‘आयकॉनिक’ विनोदी चित्रपटांसाठी ओळखली जाते. त्यांच्या या पुन्हा एकत्र येण्यामुळे, आणखी एका संस्मरणीय मनोरंजक चित्रपटाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. बालाजी मोशन पिचर्स आणि कॅप.. यांच्या संयुक्त विद्यमान निर्मित या चित्रपटात, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू, राजपाल यादव, जिष्णू सेनगुप्ता आणि मिथिला पालकर याच्या महत्त्वपूर्ण भूमिका आसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘रामायण’ चित्रपटामधील रणबीर कपूरचा पहिला लूक आला समोर

Comments are closed.