आलिया भट्टने केले धुरंधर 2 मधील रणवीर सिंगच्या अभिनयाचे कौतुक – Tezzbuzz

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. आणि आता आलिया भट्टनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

धुरंदर 2 मधील आलिया भट्टने चित्रपटाचे कौतुक करत आपला आवडता सीन कोणता ते सांगितला आहे. चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 700 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे कलाकार सातत्याने त्याचे कौतुक करत आहेत. अलीकडेच, तिने तिचा जवळचा मित्र रणवीर (ranveer)सिंगच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाचे कौतुक करणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली. चित्रपटातील एक स्टिल शेअर करत आलियाने लिहिले, “‘जकिरत सिंग रंगी’, हा क्षण सर्वकाही आहे. जेव्हा अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात परिपूर्ण ताळमेळ असतो, तेव्हा जी जादू घडते, अन् ती यात टिपली गेली आहे. टीम धुरंधरचे अभिनंदन. हा सिनेमासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.”

धुरंदर 2 हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. ‘धुरंधर 2’ मध्ये रणवीर सिंग आणि सारा  मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, आर. माधवन आणि मानव गोहिल यांच्यासह एक प्रभावी स्टारकास्ट आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ऐतिहासिक 102.55 कोटी रुपये कमावून सर्वांना आश्चर्यचकित केले. चित्रपटाचे यश इथेच थांबले नाही; अवघ्या चार दिवसांत, या स्पाय-थ्रिलरने भारतात 450 कोटींचा मोठा टप्पा ओलांडला आहे.

8 एपिसोडची हि सीरीज, तंत्र-मंत्र आणि भीतीदायक रहस्यांनी भरलेली कथा, अन् असा मृत्यूचा खेळ पाहून अंगावर येईल काटा

Comments are closed.