पुष्पा’ला पाच वर्षे पूर्ण; अल्लू अर्जुनची सुकुमारसोबतची खास आठवण सोशल मीडियावर व्हायरल – Tezzbuzz
दिग्दर्शक सुकुमार यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा: द राइज’ ला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रवासाची आठवण काढली.
250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या ॲक्शन ड्रामा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 390 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत 2021 मधील सर्वाधिक यशस्वी भारतीय चित्रपटांपैकी एक म्हणून नाव कमावले होते. हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला. आता त्याला पाच वर्षे पूर्ण होत असल्याने फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अल्लू अर्जुन (Allu Arjun)इंस्टाग्रामवर पुष्पातील एक खास फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की पुष्पाने आमच्या मागील पाच वर्षांचा प्रवास अविस्मरणीय बनवला. प्रेक्षकांनी या चित्रपटावर केलेले प्रेम आम्हाला नेहमी पुढे जाण्याची ताकद देते. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. देश-विदेशातील प्रत्येक चाहत्याने आम्हाला पंसती दिली.
त्यांनी पुढे चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानत लिहिले,आमचे कलाकार, टेक्निशियन, प्रोड्यूसर्स, डिस्ट्रीब्यूटर्स आणि विशेषतः आमचे कॅप्टन सुकुमार सर… तुमच्या सोबत काम करणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. तुमच्या मेहनतीमुळे ‘पुष्पा’ आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद.
‘पुष्पा’ ही तेलुगू भाषेतील एक भारतीय ॲक्शन-ड्रामा फिल्म असून तिचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. चित्रपटाची कथा 1990 च्या दशकातील आंध्र प्रदेशातील पर्वतरांगांमध्ये लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पा राज या व्यक्तीभोवती फिरते. पहिला भाग पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुसरी किस्त ‘पुष्पा 2, 2024 मध्ये प्रदर्शित झाला आणि तिथेही चित्रपटने अनेक नवीन रेकॉर्ड्स मोडले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
नंदमुरी बालकृष्णच्या ‘अखंड 2’ची रिलीज स्थगित; मेकर्सनी फॅन्ससाठी दिले स्पष्टीकरण
Comments are closed.