अमिताभ बच्चन याच्या 84व्या वाढदिवशी जलसा बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी बिग बींनी हात जोडून केले अभिवादन – Tezzbuzz
अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपला 84 वा वाढदिवस साजरा केला. या विशेष प्रसंगी, त्याच्या एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील त्यांच्या या निवास्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या प्रचंड गर्दिला अमिताभ बच्चन यांनी अभिवादन केले, नेहमी प्रमाणे या रवीवारची परंपरा कायम ठेवत बिग बी गर्दिला अभिवादन करण्यासाठी बाहेर आले होते आणि त्यांनी पाहताच चाहत्यांनी आंनद व्यक्त केला. आणि याच वेळी चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
अमिताभ (amitabh)बच्चन हे काही पण झाले तरी त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी दर रवीवारी वेळ काढतात, या रवीवारी त्यांच्या वाढदिवसाचेहि औचित्य साधुन आले. आणि त्याचे हितचिंतक आणि चाहते त्यांना 84व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थान ‘जलसा’च्या प्रवेशद्वारावर जमले होते. आणि या दरम्यानचे व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
या व्हिडिओ मध्ये अमिताभ बच्चन एका व्यासपीठावर बहुरंगी पारंपरिक पोशाखात उभे असलेले दिसत आहेत. या प्रसंगासाठी, बिग बी यांनी गडद मरून रंगाचा कुर्ता आणि काश्मिरी कानी पश्मिना शाल परिधान केली होती. आणि 40 वर्षांपासून मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांना भेटण्यासाठी ही विशेष परंपरा पाळत आहेत. त्यांनी या वेळी हात जोडुन सर्व चाहत्यांना अभिवादन केले. तसेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सोशल मिडायावर अनेक दिग्गज कलाकार चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
हेही वाचा
तब्बल 15 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला, एकता कपूरने केली घोषणा
Comments are closed.