'ये रिश्ता क्या कहलाता है'ला अंजू जाधवचा संदेश – दैनिक बॉम्बबॉम्ब

अंजू जाधव हि एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने आतापर्यत अनेक उत्तम भुमिका साकारल्या आहेत. आणि तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आणि आता एक मालिकेमुळे चर्चेत आहे. ते म्हणजे तिने एका लोकप्रिय मालिकेत काम केले होते. आणि तिचा हा या मालिकेतील प्रवास आता थांबला आहे. तर हि मलिका म्हणजे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ , या मालिकेला तिने निरोप दिला आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अंजू जाधवने मेहेरची भूमिका साकारली होती. जिच्या एन्ट्रीमुळे पोद्दार कुटुंबात खळबळ उडाली होती. तर आता या  अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी ही बातमी शेअर केली आणि संपूर्ण टीमसाठी एक खास नोटही लिहिली. अभिराच्या खुलास्यानंतर तिच्या पात्राचा प्रवास संपला. सेटवरील तिच्या शेवटच्या दिवशी, अभिनेत्रीने संपूर्ण कलाकारांसोबतचे शूटिंगमधील काही सुंदर क्षण शेअर केले.

अंजू (anju)जाधवने पोस्ट शेअर करत “माझी YRKKH टीम. शूटिंगचा शेवटचा दिवस. हे सर्व स्वप्नासारखे वाटते आहे. मला माझ्या टीमची किती आठवण येते हे मी व्यक्त करू शकत नाही. हे फक्त काम नव्हते तर ते कुटुंबासारखे झाले होते. तर अंजू जाधव 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने  “संकट मोचन महाबली हनुमान,” “कुछ रंग प्यार के ऐसे भी,” “कसौटी जिंदगी की,” आणि “वागले की दुनिया – नई पीडी नयी किससे” यासह अनेक टेलिव्हिजन मालिकामध्ये आपली छाप सोडली.

19 वर्षांपूर्वीची चार मुलींची कथा सांगणारी ह्या मालिकेला IMDb आहे 6.1 रेटिंग

Comments are closed.