पापाराझींवर भडकली अंकिता लोखंडे; नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण – Tezzbuzz
अभिनेत्री अंकिता लोखंडेने शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी तिचा ४१ वा वाढदिवस कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत साजरा केला. या खास सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यापैकी एका व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता पापाराझींवर नाराजी व्यक्त करताना दिसत असून, तिचा राग स्पष्टपणे पाहायला मिळतो.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)तिचा पती आणि उद्योजक विकी जैनसोबत वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर पापाराझींना फोटोसाठी पोज देत होती. याच वेळी काही पापाराझींनी कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या अंकिताने त्यांना फटकारत, “तुम्ही लोक आत का आलात? तुम्ही असं करू नये,” असे सुनावले. या प्रकारामुळे अंकिता आणि विकी दोघेही नाराज झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, वाढदिवसापूर्वीच अंकिता आणि विकी जैन हे जोडपे चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचा चौथा लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. याच काळात जीएसटी विभागाने त्यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायांवर छापे टाकल्याची माहिती समोर आली. प्राथमिक तपासात कर इनपुटमध्ये तफावत आणि काही व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अंकिता लोखंडे अलीकडे तिच्या पती विकी जैनसोबत विविध रिएलिटी शोमध्ये दिसली आहे. ‘लाफ्टर शेफ २’ आणि ‘बिग बॉस’सारख्या लोकप्रिय शोमधून हे जोडपे प्रेक्षकांच्या भेटीला आले. याशिवाय, दोघे मिळून एक यूट्यूब व्ह्लॉग चॅनलही चालवतात, ज्यामध्ये त्यांच्या दैनंदिन आयुष्याची झलक दाखवली जाते. अभिनयाच्या क्षेत्रात अंकिताने २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रणदीप हुड्डासोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मल्याळम सिनेसृष्टीला मोठा धक्का; अभिनेता-दिग्दर्शक श्रीनिवासन यांचे 69 व्या वर्षी निधन
Comments are closed.