वॅकिसायबाचाया व्लागामाध्या अंकीचंच मथम खुलसन – दैनिक बॉम्बबॉम्ब
अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीच्या (Ankita Lokhande) चर्चा खूप दिवसांपासून सुरू हाेत्या. आता तिने तिच्या नवऱ्यासोबतच्या नवीन व्लॉगमध्ये यावर खुलासा केला आहे.
अंकिता लोखंडे आणि विक्की जैन ही टीव्हीमधली खूप फेमस जाेडी आहे. दाेघंही ‘लाफ्टर शेफ’ च्या दाेन्ही सीझनमध्ये दिसले आहेत. अलीकडे खूप दिवसांपासून अंकिता प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु हाेत्या, ‘लाफ्टर शेफ 2’ च्या सेटवर कृष्णा अभिषेक तिला धावत लावत असताना तिने मजेत सांगितलं हाेतं की, “हाे, मी प्रेग्नेंट आहे”. तेव्हापासून लाेकांमध्ये चर्चा सुरी झाली की, हे दाेघं लवकरच आई-बाबा हाेणार. आता अखेर अंकिता आणि विक्कीने त्यांच्या व्लाॅगमध्ये या अफवांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
अंकिता आणि विक्कीने त्यांच्या नवीन व्लाॅगमध्ये प्रेग्नेंसीच्या अफांवर बाेललं आहे. व्लाॅगमध्ये अंकिता हसत म्हणते, “बातम्या तर किती दिवसांपासून येतात…पण प्रश्न असा असायला हवा की, प्रेग्नेंसी कधी हाेणार! सगळं कुटुंब यात लागलयं. चर्चा सुरु आहे, नेगाेशिएशन सुरू आहे. मी तर या सगळ्या प्रश्नांना कंटाळले आहे”. नंतर ती म्हणते, “माफ करा मित्रांनाे…मी नक्की उत्तर देईन, पण जेव्हा मी खरंच प्रेग्नेंट हाेईल तेव्हाच!”
याआधी शूटिंगदरम्यान कृष्णा अभिषेक आणि करण कुंद्राने अंकिताला तिच्या “प्रेग्नेंसी” वरुन मजेत चिडवलं हाेतं, आणि त्यामुळेच या अफवांना अजून जास्त जाेर मिळाला. पण अंकिता-विक्कीच्या व्लाॅगमध्ये हे स्पष्ट झालं की, कुटुंबात या विषयावर चर्चा चालू आहे, पण अजून काहीहि पक्कं किंवा अधिकृत ठरलेलं नाही.
या व्लाॅगमध्ये दाेघांनी त्यांच्या प्रेमाच्या सुरूवातीच्या गाेड आठवणीही शेअर केल्या. अंकिताने सांगितलं की, त्यांच्या नात्याची सुरूवात तिनेच केली हाेती. आपल्या कझिनच्या म्हणण्यानं तिने विक्कीला मेजेस केला आणि मग त्याला पहिल्या डेटला घेऊन गेली. त्याच दिवशी त्यांच्या नात्याची सुरूवात झाली आणि एक घट्ट आणि मजबूत बाॅन्ड तयार झाला. या वेळेत विक्कीनंही अंकिताचं भरभरुन कौतुक केलं. ताे म्हणाला, “अंकितामध्ये एक गाेष्ट मला खूप आवडते, ती कधीच नातं तुटू देत नाही. कितीही टफ वेळ का आला, तरी अंकिता नातं सांभाळून ठेवते, ते जाेडून ठेवते”.
अंकिताने विक्कीला आपला ‘सपाेर्ट सिस्टिम’ म्हटलं. ती म्हणाली, “ताे नेहमी बघताे की, मी माझी स्वप्नं विसरू नये…कधी कधी मला स्वतःवर विश्वास वाटत नाही, थाेडं कमजाेर वाटतं, पण ताे मला नेहमी हिम्मत दाेताे, पुढे जाण्यास सागंताे. ताे खूप कौतुक करत नाही, पण नेहमी मला प्रेरणा देताे. त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे”.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
देश स्वतंत्र व्हायच्या आधीच ‘किस्मत’ ने केला 1 काेटीचा धमाका !
पोस्ट विक्कीसाेबतच्या व्लाॅगमध्ये अंकिताचं माेठं खुलासं प्रथम वर दिसले डेनिक बॉम्बबॉम्ब?
Comments are closed.