अनुपम खेरच्या आई दुलारींचा अपघात,फॅन्सच्या प्रार्थनेसाठी अभिनेत्याने व्यक्त केले आभार – Tezzbuzz

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर (Anupam kheer)अनेकदा आपल्या आईसोबतचे क्षण सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, काल गुरुवारी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांच्या काळजीला कारण निर्माण झाले. त्यांची आई दुलारी यांना घरात पाय घसरल्यामुळे डोक्यावर जोराचा मार लागला. ही घटना पाहून फॅन्सनी त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना आणि शुभेच्छा पाठवायला सुरुवात केली.

अनुपम खेरने पोस्टमध्ये लिहिले,आईला दुखापत झाली आहे. खूप जोराचा मार लागला आहे. तीने लपवण्याचा प्रयत्न केला, पण आई, प्रत्येक आईसारखी, खूप मजबूत आहे. लवकरच ती बरी होईल.आम्ही खूप भाग्यशाली आहोत की आमच्यासोबत राजूची पत्नी रीमा आहे, जी आईची काळजी खूप प्रेमाने घेत आहेत. रीमा जी आणि माता दुलारी की जय हो.

शेआर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुपम खेर त्यांच्या मातेस विचारतात की दुखापत किती झाली, तर दुलारी म्हणतात की देवाने त्यांचे डोळे वाचवले. त्यांच्या पायावर आणि हातावर मार लागला, पण मोठा धोका टळला. अनुपम खेर म्हणाले, फॅन्सचे संदेश आणि कॉल मिळाले, प्रत्येकजण आमच्या आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे.

आज अनुपम खेरने दुसरी पोस्ट शेअर करत सर्वांना धन्यवाद दिले. त्यांनी फॅन्ससाठी लिहिले, आईला झालेल्या दुखापतीनंतर तुम्ही सर्वांनी पाठवलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मनापासून आभार. तुमच्या प्रार्थनांमुळे आमच्या परिवाराला आणि आईला खूप दिलासा मिळाला.

ही घटना फॅन्ससाठी भावनिक ठरली असून, अनेकांनी सोशल मीडियावर अनुपम खेर आणि त्यांच्या आईसाठी प्रार्थना केली. दुलारीची प्रकृती आता स्थिर असल्याचे अपडेट मिळाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

सोनाक्षी–जहीरच्या नात्यात लग्नाआधी तणाव; भांडण इतके वाढले की केस उपटण्याची आली होती वेळ

Comments are closed.