आदित्य सील-अनुष्का रंजन यांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन, जुळ्या मुलींचे झाले आई-बाबा – Tezzbuzz
आदित्य सील आणि त्याची पत्नी अनुष्का रंजन या दोघांनी नुकतच आई वडिल झाल्यांची गोड बातमी शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताच त्यांनी चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव करायला सुरुवात केली. आणि अनुष्का ही अलियाची खास मैत्रीण असल्याने ती हि मावशी बनली आहे.
अनुष्का आणि आदित्यने एका संयुक्त पोस्टद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आणि त्यांच्या जुळ्या मुलींची नावेही उघड केली. या जोडप्याने आपल्या मुलींची नावे वीरा आणि माही ठेवली आहेत. हि माहीती या जोडप्यानी २३ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन सांगितली होती.
आदित्य आणि अनुष्काने हि आंनदाची पोस्ट शेअर करत लिहले आहे की, ही बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. 23.08.2026 रोजी जन्मलेल्या आमच्या मुली, वीरा रंजन सील आणि माही रंजन सील यांचे स्वागत करताना आमची मन आनंदाने भरून गेली आहेत. आमची सनशाईन आणि आमजे आनंद वाढवण्यासाठी आले आहेत. तसेच त्याच्या या पोस्ट मधील फोटो आणि कॅप्शन मुळे ते खुप खुश दिसत आहेत.
या जोडप्यांनी ही माहीती शेअर करताच त्यांना अनेक जणांनी अभिनंदानाचे संदेश पाटवले आहेत. आकांक्षा रंजन कपूरपासून ते सोहा अली खान, कुणाल कपूर, प्रिया बॅनर्जी, अनुषा दांडेकर, आहाना कुमरा, भूमी पेडणेकर, प्रनूतन बहल अश्या अनेक कलाकारांनी त्यांना कमेंट करुन अभिनंदन केले आहे.
हेही वाचा
‘हट ना बे’, तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपुरचे मजेशीर उत्तर
Comments are closed.