नाईटक्लबमध्ये अर्जुन रामपालने सांभाळली DJची कमान, व्हायरल व्हिडिओत चाहत्यांची प्रचंड गर्दी – Tezzbuzz

अर्जुन रामपाल सध्या आपल्या ‘धुरंधर’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने मेजर इक्बाल ही अत्यंत धाकड आणि भीषण व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाच्या जोरावर कौतुकाची थाप मिळत असतानाच, आता अर्जुन रामपाल एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडेच अर्जुन रामपाल (Arjun Rampal)एका नाईटक्लबमध्ये DJ म्हणून दिसला. पंखुडी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये टी-शर्ट घातलेला अर्जुन गळ्यात हेडफोन टाकून DJ कन्सोलवर उभा असल्याचे दिसत आहे. तो गाणी वाजवत स्वतःही ठेक्यावर थिरकत होता, तर त्याच्या धुनांवर क्लबमधील लोकांनीही जोरदार डान्स केला.हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने त्याला “DJ रामपाल” असे नाव दिले, तर काहींनी त्याच्या मल्टिटॅलेंटेड व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. काही चाहत्यांनी तर “हा क्षण मिस झाला” असेही म्हटले.

अर्जुन रामपालने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटात मेजर इक्बालची भूमिका साकारली होती. हा रोल आयएसआयशी संबंधित असून अत्यंत क्रूर आणि प्रभावी आहे. अर्जुनने या व्यक्तिरेखेत जीव ओतला असून त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांना दाद मिळत असली तरी अर्जुनची कामगिरी विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

चित्रपटासोबतच अर्जुन रामपाल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. ५३ व्या वर्षी त्याने आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियाडेससोबत सगाई केल्याची चर्चा रंगली होती. दोघे अनेक वर्षांपासून एकत्र राहत असून त्यांना दोन मुलेही आहेत. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे.

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या गॅब्रिएला डेमेट्रियाडेसने वयाच्या १६व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केले. फॅशन डिझाइनचे शिक्षण घेतल्यानंतर तिने मॉडेलिंग, चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओत काम केले. त्याचबरोबर ‘डेमे’ हा स्वतःचा क्लोथिंग ब्रँड सुरू करत आणि ‘VRTT विंटेज’ची स्थापना करून तिने फॅशन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्या अर्जुन आणि गॅब्रिएला सोशल मीडियावरही एकमेकांवरील प्रेम खुलेपणाने व्यक्त करताना दिसत असून, अर्जुन रामपाल पुन्हा एकदा प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही कारणांनी चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अहान पांडेंच्या वाढदिवसादिवशी अनीत पड्डाची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, मी भविष्य पाहिले आहे

Comments are closed.