विजयाच्या अगदी दारात येऊनही ट्रॉफी निसटली; ही स्पर्धक ठरली ‘बिग बॉस 19’ची फर्स्ट रनर-अप – Tezzbuzz

देशभरात सर्वाधिक चर्चेत असलेला रियलिटी शो ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले भव्य सोहळ्यात पार पडला.. या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला असून त्याने चमकदार प्रदर्शनाच्या जोरावर ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर कश्मीरी अभिनेत्री फरहाना भट्ट हिने पहिली रनर-अपची पदवी मिळवून प्रेक्षकांची मने जिंकली. अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांच्या एलिमिनेशननंतर टॉप 3 मध्ये प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट (Farhana Bhatt)यांचा समावेश होता. शेवटच्या टप्प्यात प्रणित मोरे बाहेर पडताच गौरव आणि फरहाना यांच्यात तुफानी स्पर्धा रंगली. शेवटी होस्ट सलमान खान यांनी गौरव खन्नाचे नाव विजेता म्हणून घोषित करताच स्टुडिओमध्ये जल्लोष उसळला.

फिनालेदरम्यान बिग बॉस यांनी गौरव आणि फरहाना या दोघांच्या घरातील संपूर्ण प्रवासाची उजळणी केली. त्यांनी दोघांनीही घरात प्रामाणिकपणे, धैर्याने आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवून खेळ खेळल्याचे सांगत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बिग बॉसची मनोगत ऐकताना दोन्ही स्पर्धक भावूक झाले आणि एकमेकांना मिठी मारून सहप्रवासाचा सन्मान व्यक्त केला. सुरुवातीपासूनच फरहाना ही प्रेक्षकांची फेव्हरेट कंटेस्टंट मानली जात होती. अनेक सोशल मीडिया पोल्समध्ये तिचे नाव वर असल्याने तिला विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र अखेरीस ट्रॉफी गौरव खन्नाच्या वाट्याला आली.

फरहाना भट्टचा या शोमधील प्रवास नाट्यमय आणि प्रेरणादायी राहिला. पहिल्या आठवड्यात घराबाहेर पडूनही तिने दमदार कमबॅक करत थेट फिनालेपर्यंत मजल मारली. घरातील सदस्यांमधील वाद, नाती आणि खेळातील ट्विस्ट—या सर्वांमध्ये तिने आपली वेगळी छाप निर्माण केली.

15 मार्च 1997 रोजी श्रीनगरमध्ये जन्मलेली फरहाना एका पारंपरिक कश्मीरी कुटुंबातून आली आहे. तिने ‘मजनू’ (2018), ‘नोटबुक’ (2019) यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. 2016 मध्ये सनी कौशलसोबतच्या SMTT या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. एसकेएफ, यशराज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म्स, धर्मा प्रॉडक्शन्स यांसारख्या नामांकित बॅनर्ससोबत काम करत तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

कॉर्पोरेट जॉबपासून Big Boss 19च्या ट्रॉफीपर्यंतचा गौरव खन्नांचा प्रवास,किती आहे त्यांची अफाट संपत्ती?

Comments are closed.