बोमन इराणींचा डोनाल्ड ट्रम्पवर विनोदी टोला, गॅस सिलेंडरची मागणी करत ईरान चर्चेवर केली टिप्पणी – Tezzbuzz
बोमन इराणी हे एक हे एक बॉलीवूड मधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सहज आणि सोप्या, विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच ते सोशल मीडियावर ही सतत ऍक्टिव्ह असतात. आणि सध्याच्या सुरू असणाऱ्या युद्ध परिस्थितीवर त्यांनी एक मजेशर व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू आहे. तर यांचा परिणाम भारतासारख्या इतर प्रदेशांवरही झाला आहे. या सगळ्यात, डोनाल्ड ट्रम्प इराणींसोबत “शांतता चर्चा” करण्याचा दावा करत आहेत. ज्यामुळे बोमन इराणींनी विनोदी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी (irani)यांनी या व्हिडिओ त्यांनी म्हणले आहे की, “तर, तुम्हाला माहीत असेलच की, श्री. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी लोकांशी बोलायचे आहे. तर त्यासाठी तीन लोकांना आमंत्रित केले आहे, ही चर्चा स्मृतीजी, अरुणा इराणीजी आणि मी, बोमन इराणी यांच्यासोबत असेल, तर मी तयार आहे. मी शांततेसाठी काहीही करायला तयार आहे. पण “माझी एकच अडचण आहे. मी वॉशिंग्टनला जाणार नाही.” मला वाटतं की श्री. ट्रम्प आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने दादर पारसी कॉलनीत यावं हे उत्तम होईल. आम्ही त्यांना धन्सक, कस्टर्ड आणि इतर पदार्थ खाऊ घालू, पण जर त्यांनी सोबत एक मोठा गॅस सिलेंडर आणला, तर मला वाटतं की आपल्या सर्वांसाठी ते खूप सोपं होईल.
बोमनच्या विनोदी स्वभावावर सेलिब्रिटींनाही हसू आवरता आले नाही. समीरा रेड्डीने अनेक हसणाऱ्या इमोजींसोबत “अप्रतिम” असे लिहिले. सिद्धार्थने सॅल्यूट इमोजीसोबत “तुमचं मन खूप मोठं आहे, सर,” असे लिहिले. फरहान अख्तर आणि रिकी केज यांनी कमेंट्समध्ये हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत.
रश्मिका-विजयच्या लग्नाला पूर्ण झाला एक महिना, खास पोस्टच्या कॅप्शनने जिंकली चाहत्यांची मनं
Comments are closed.