सलमान खानच्या मातृभूमीच्या नव्या गाण्याला 24 तासात मिलियन व्ह्यूज, बॉलीवूडच्या फ्रेश जोडीने जिंकले मन – Tezzbuzz
सलमान खान हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. आणि चित्रपटातून या अभिनेताने प्रेक्षकांचे मनात घर निर्माण केले आहे. तर सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे आगामी चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ तसेच यातील गाणे ‘चांद देख लेना’ हे ईदच्या आधी प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात चंद्राचे भावनिक महत्त्व सुंदरपणे टिपले आहे, ज्याला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. आणि हे गाणे सध्या सोशल मीडियावर हिट झाले आहे.
मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चित्रपटातील शीर्षक गीत, ‘मातृभूमी’ हे खूप गाजले. तर त्याला आता 5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ‘मैं हूँ’ हे गाणे प्रदर्शित झाले. आणि आता, ‘चांद देख लेना’ या नवीन गाण्याने चित्रपटाची कथा आणि संगीताबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आहे. तर बॉलिवूडच्या जुन्या आणि खऱ्या प्रेमकथांची आठवण करून देणारे हे गाणे आहे. एका सैनिकाचे कर्तव्य आणि त्याच्या नात्यांमधील भावनिक प्रवास सुंदरपणे चित्रित केले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये चित्रांगदा सिंग (singh)एका सैनिकाच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
या गाण्यात, चित्रांगदा सिंग सीमेवर तैनात असलेल्या आपल्या पतीची घरी परतण्याची वाट पाहत आहे. हे गाणे देशाचे रक्षण करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कुटुंबांच्या सामर्थ्याला सलाम करते. संगीत क्षेत्रात नावीन्य आणण्याच्या प्रयत्नात, सलमान खानने या गाण्याच्या माध्यमातून नवीन प्रतिभेला संधी दिली आहे.
स्वतःच्या आवाजावर नाराज असलेली ही अभिनेत्री ठरली स्टार, करण जोहरने दिला करिअरला टर्निंग पॉइंट
Comments are closed.