CBFC कडून ‘कॉकटेल 2’ला हिरवा कंदील, रोमँटिक दृश्यांवर नाही लागली कात्री – Tezzbuzz
कॉकटेल हा एक हा एक बॉलीवूड मधील लोकप्रिय चित्रपट आहे. आणि त्याचा सिक्वेल ‘कॉकटेल 2’ नुकतंच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने युवकांची मने जिंकलीच आणि याच्या सिक्वेलने सुद्धा आता चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. ‘कॉकटेल 2 मध्ये शाहिद कपूर, रश्मिका मंदान्ना आणि कृती सनॉन यांची मुख्य भूमिका आहे. तर सध्या हा चित्रपट आणि त्यातील गाणी चांगलीच चर्चेत आहेत. हा चित्रपट 19 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
शाहिद कापूर,(kapoor) रश्मिका मंदान्ना आणि कृती सनॉन अभिनित कॉकटेल 2′ च्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, सीबीएफसीने (CBFC) या चित्रपटातील कोणतेही दृश्य कापलेले नाही, सर्व जवळीक साधणारी आणि रोमँटिक दृश्ये जशीच्या तशी ठेवण्यात आली आहेत. मात्र, बोर्डाने निर्मात्यांना ऑडिओमध्ये काही बदल करण्यास सांगितले आहे. याव्यतिरिक्त, सबटायटल्समध्ये असलेले अपशब्द काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि ‘अग्नी’ हा शब्द बदलून ‘दिया’ असा करण्यात आला आहे.
16 जून रोजी सीबीएफसीने ‘कॉकटेल 2’ ला ‘A’ प्रमाणपत्र देऊन मंजुरी दिली. चित्रपटाच्या कालावधीबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट 149 मिनिटे आणि 19 सेकंद इतका मोठा आहे. प्रमाणपत्रातील माहितीनुसार, ‘ज्यू ऑन द रन’ या उल्लेखालाही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, हा संदर्भ एखाद्या व्यक्तीबद्दल आहे की परिस्थितीबद्दल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. कॉकटेल’चा पहिला भाग 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता याचा सिक्वेल येत आहे. या सिक्वेलची प्रेक्षक खुप आतुरतेने वाट पाहत होते मात्र आता हा चित्रपट काहिच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘370 रुपयांची बिर्याणी’ प्रकरण तापलं, महाराष्ट्रानंतर आता गुरुग्राममध्येही प्रणीत मोरे अडचणीत
Comments are closed.