तू इतकी मोठी अभिनेत्री नाहीस, म्हणून यामी गौतमीला डिझायनरने नाकारला होता लेहेंगा, आईची साडी नेसून आदित्यची दुल्हन बनली हि अभिनेत्री – Tezzbuzz
सध्या बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालत असणारा चित्रपट म्हणजे धुरंदर 2, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे आणि अजून सध्या करत आहे. तर याचे श्रेय दिग्दर्शक आदित्य धर यांना जाते, तसेच संपूर्ण टीमलाही जाते. यातील चित्रपटाची कथा तसेच अभिनेत्यांचे अभिनयाचे कौतुक होत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही येत आहेत. आदित्य धर आणि त्यांची पत्नी यामी गौतम त्यांच्या चित्रपटांच्या यशामुळे चर्चेत आहे.
आदित्य धरा (Dhar)आणि यामी गौतम हे जोडपे सहसा प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. आदित्य आणि यामी यांनी 2021 मध्ये साध्या वेशात लग्न केले. त्यांनी कोणताही गाजावाजा लग्न केले होते. मात्र, यामीने स्वतः एकदा खुलासा केला होता की, एका प्रसिद्ध डिझायनरने तिला आपला लेहेंगा देण्यास नकार दिल्यानंतर तिने तिच्या आईच्या साडी नेसुन लग्न केले होते.
यामी गौतमने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिने हे फोटो शेअर केले होते. यामीने तिच्या लग्नात तिच्या साधी पण सुंदर आईची साडी नेसली होती. तर यामुळे तिने अनेकांची मने जिंकली. मात्र, यामीने नंतर खुलासा केला की, ती एक प्रसिद्ध अभिनेत्री नसल्याचे कारण देत एका डिझायनरने तिला लेहेंगा देण्यास नकार दिला होता. एका संभाषणात यामी गौतमने तिच्या आणि आदित्य धरच्या प्रेमकथेबद्दल सांगितले. यामीने खुलासा केला की ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’च्या प्रमोशनदरम्यान ते दोघे बोलू लागले आणि मित्र बनले, आणि नंतर लग्न झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.