धनुष आणि मृणाल ठाकूरचं लग्न झालं? व्हायरल व्हिडीओमागचं खरं सत्य, घ्या जाणून – Tezzbuzz

दक्षिणेतील सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होत्या. एवढंच नाही तर हे दोघे 14 फेब्रुवारी 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. मात्र मृणालच्या जवळच्या सूत्रांनी या सर्व चर्चांचे खंडन केलं होतं.

अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धनुष्य (Dhanush)आणि मृणाल पारंपरिक साऊथ इंडियन विवाहसोहळ्यात लग्न करताना दिसत आहेत. व्हिडीओ इतका खरा वाटतो की अनेकांनी तो खरंच लग्नाचा व्हिडीओ असल्याचं मानलं. त्यामुळे धनुष–मृणालच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तृषा, श्रुती हासन, अनिरुद्ध रविचंदर, अजित कुमार, दुलकर सलमान आणि थलपती विजय यांसारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती दाखवण्यात आली आहे. मात्र वास्तव असं आहे की हा व्हिडीओ पूर्णपणे AI-जनरेटेड आहे.

AI लग्नाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूपच भारी AI काम आहे… अजित तर त्या दिवशी दुबईत होते.” तर दुसऱ्याने लिहिलं, “लग्न ठीक आहे, पण विजय आणि अजित सगळ्यांच्या मागे उभे आहेत, हे पाहून हसू आलं.” आणखी एका नेटकऱ्याने गंमतीने म्हटलं, “धनुष स्वतःच शॉकमध्ये दिसतोय!”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका सूत्राने मिडियाला सांगितलं होतं की, “मृणाल पुढच्या महिन्यात लग्न करत नाहीये. ही केवळ अफवा आहे. फेब्रुवारीत तिचा एक चित्रपट रिलीज होणार आहे आणि मार्चमध्ये तेलुगूतील आणखी एका चित्रपटाचा प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत ती लग्न का करेल?”

कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं तर मृणाल ठाकूरकडे ‘दो दिवाने शहर में’, ‘डकैत: अ लव्ह स्टोरी’, ‘है जवानी तो इश्क होना है’ आणि ‘पूजा मेरी जान’ असे अनेक बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट्स आहेत. तर धनुष लवकरच ‘कारा’ या चित्रपटात झळकणार असून, या सिनेमाचं दिग्दर्शन विग्नेश राजा करणार आहेत.

एकूणच, सोशल मीडियावर व्हायरल झालेला धनुष–मृणालचा लग्नाचा व्हिडीओ खरा नसून, तो AIचा कमाल नमुना आहे. मात्र यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला मात्र चांगलंच उधाण आलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अनुभव सिन्हाचा ‘अस्सी’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित, तापसी पन्नूसोबत पुन्हा एकदा एकत्र

Comments are closed.