ज्युनियर कौशल’चा फोटो? विकीचा फोन पाहताच आलियाच्या चेहऱ्यावर उमटले हास्य; सोशल मीडियावर चर्चा – Tezzbuzz

15 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२५ सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात विकी कौशल आणि आलिया भट्ट (आलिया-भट)यांची उपस्थिती विशेष चर्चेत राहिली. आलिया काळ्या रंगाच्या एलिगंट गाऊनमध्ये दिसली, तर विकी निळ्या रंगाच्या सूटमध्ये नेहमीप्रमाणेच देखणा दिसत होता. दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत.

कार्यक्रमातील काही इनसाइड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये विकी आणि आलिया पुढच्या रांगेत शेजारी बसलेले दिसत आहेत. या फोटोंमध्ये आलिया विकीच्या फोनकडे लक्षपूर्वक पाहताना आणि हसताना दिसत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

व्हायरल फोटोंमध्ये विकी कौशल आलियाला त्याच्या मोबाईलवर काहीतरी दाखवत असल्याचे स्पष्ट दिसते. आलियाच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहता, अनेक नेटकऱ्यांचा अंदाज आहे की विकी आलियाला त्याचा आणि कतरिना कैफचा मुलाचा फोटो दाखवत होता. काही चाहत्यांनी तर कमेंट करत म्हटले आहे की, “आलियाची प्रतिक्रिया सांगते की तो फोटो नक्कीच विकी कौशलच्या बाळचा असावा.”

या फोटोंवर युजर्सकडून मजेशीर आणि भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.एका युजरने लिहिले, “सिद्धार्थ, आलिया, वरुण, विकी, कियारा… सगळ्यांनी एकत्र करिअर सुरू केले आणि आता सगळे पालक झाले आहेत.”दुसऱ्याने लिहिले, “युनिव्हर्सल बेबी डॅड राज… आपल्या बाळाचा फोटो सहकाऱ्यांना दाखवायलाच हवा.”तर आणखी एका युजरने म्हटले, “आलियाची प्रतिक्रिया पाहून मलाही विकी कौशलच्या बाळचा फोटो पाहायची उत्सुकता लागली आहे.”

दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफ 7 नोव्हेंबर रोजी पालक झाले. कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र, या स्टार कपलने अद्याप त्यांच्या मुलाचा चेहरा किंवा नाव सार्वजनिक केलेले नाही.

याआधी 1 सप्टेंबर रोजी विकी–कतरिनाने गरोदरपणाची घोषणा करणारा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये विकी कतरिनाच्या बेबी बंपला धरून उभा दिसत होता. तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.

आता फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समधील हे व्हायरल फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली असून, विकी कौशलच्या बाळचा  पहिला फोटो कधी पाहायला मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

धुरंधर’ची नायिका 3 वर्षांपूर्वी बालकलाकार होती; संजय दत्तसोबतच्या चित्रपटाने मिळवली ओळख

Comments are closed.