मला काही फरक पडत नाही, पाकिस्तानबाबत दिग्दर्शक आदित्य धर यांनी टिपणी केलेला व्हिडिओ होतोय व्हायरल – Tezzbuzz

रणवीर सिंग अभिनेता आणि आदित्य धर दिग्दर्शित धुरंदर हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आता धुरंदर 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेत आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ॲडव्हान्स बुकिंग मधून उत्तम कमाई केली आहे. तर रिलीज नंतर किती कमाई करेल हे पाहणे गरजेचे आहे. धुरंदर हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे तर 18 मार्चच्या संध्याकाळी पेड प्रिव्ह्यू सुरू होईल.

आदित्य धर यांनी  2019मध्ये “उरी: द सर्जिकल स्ट्राईक” या त्यांच्या पहिल्या चित्रपटाद्वारे आपली क्षमता सिद्ध केली. 2016 च्या उरी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यावर आधारित या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्डच मोडले नाहीत तर चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकले. यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदित्य धर, सर्वोत्कृष्ट अभिनेता विकी (vicky)कौशल, सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी आणि सर्वोत्कृष्ट संगीत शाश्वत सचदेव यांचा समावेश होता. मनोरंजक गोष्ट म्हणजे, संगीतकार शाश्वत सचदेव देखील ‘धुरंधर’ फ्रँचायझीसाठी परतले आहेत.

https://www.instagram.com/reel/DVoSCy2jZvz/?igsh=MWFsZHA3anNtYzN6OA==

महत्वाची अशी एक गोष्ट आहे जी म्हणजे, यामी गौतम, मोहित रैना, परेश रावल आणि कीर्ती कुल्हारी यांच्या प्रमुख भूमिका असलेला “उरी” आणि “धुरंधर” पाकिस्तानमध्ये अधिकृतपणे प्रदर्शित न झाल्याने, या चित्रपटांना तेथे प्रचंड चाहते मिळाले आहेत. अहवालांनुसार, “धुरंधर” च्या पायरेटेड प्रती पाकिस्तानमध्ये फक्त 16 मध्ये विकल्या गेल्या. रिलीज झाल्यानंतर फक्त 12 दिवसांतच 20 लाखांहून अधिक बेकायदेशीर डाउनलोड्स नोंदवले गेले. धुरंधर 2 या चित्रपटाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

जोधा अकबर: टीव्हीवरील महम अंगा ही 11 वर्षानंतर खूप बदलली, तर तिचा हा बदललेला लेटेस्ट फोटो होतोय व्हायरल

Comments are closed.