‘ये जवानी है दीवानी’ मधील लारा हिचं घर तुटणार? लग्नाच्या 5 वर्षांनंतर एव्हलिन शर्मा घेणार घटस्फोट – Tezzbuzz

चित्रपटसृष्टी मध्ये असे अनेक कलाकार आहेत जे छोटीशी भूमिका करून सुद्धा प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहेत. असाच एक उत्तम चित्रपट म्हणजे ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटातून अनेक कलाकरांना प्रसिद्धी मिळाली. त्यातीलच एक म्हणजे लाराच्या भूमिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री एव्हलिन शर्मा. तर ती तिच्या वैयक्तिक कारणामुळे सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री एव्हलिन शर्माने लग्नाच्या पाच वर्षांनंतर तिचा पती तुशान भिंडीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

पती तुशान भिंडीपासून विभक्त होण्याची हि गोष्ट स्वतः अभिनेत्री एव्हलिनने सांगितले आहे. एव्हलिनने 2021 मध्ये डेंटल सर्जन तुशान भिंडीशी लग्न केले होते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत होत्या, ज्यामुळे या जोडप्याने परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एव्हलिन आणि तुशान यांना दोन मुले आहेत, ज्यांना त्यांनी एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एव्हलिन शर्माच्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसला आहे.

एका मुलाखती दरम्यान एव्हलिन शर्माने (sharma)तुशान भिंडीपासून विभक्त होण्याच्या निर्णय म्हणाली की, आम्ही जरी आता विभक्त होत असलो तरी  आम्ही आयुष्यभराच्या मैत्रीवर आणि आमच्या मुलांच्या सह-पालकत्वावर आमचे नवीन आयुष्य उभारत आहोत. तर एव्हलिन शर्मा आणि तुशान भिंडी यांनी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे एका खाजगी समारंभात त्यांनी लग्न केले होते. आणि 2021 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या अपत्याचे, मुलगी एवा रानिया भिंडीचे, स्वागत केले आणि 2023 मध्ये त्यांनी मुलगा आर्डेनचे स्वागत केले.

भूत बंगला चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, ‘द राजा साब’लाही दिली टक्कर, 2026 मधील पाचवी सर्वात मोठी फिल्म बनली

Comments are closed.