प्रसिद्ध अभिनेते थक्काली श्रीनिवास यांचे निधन, संगीतापासून फिल्म मेकिंगपर्यंत उमटवली छाप – Tezzbuzz
तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. असाच एक अभिनेता जो मानवतावादी व्यक्तिमत्व असलेला तो म्हणजे थक्काली श्रीनिवास होय. तर यांच्याबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे. यांचे निधन झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीमधील त्यांचे चाहते त्यांच्या जाणाने हळहळ व्यक्त करत आहे. अभिनय, संगीत, दिग्दर्शक तसेच निर्माता म्हणून त्यांच्या कामात त्यांनी छाप सोडली होती.
थक्कली श्रीनिवास (Srinivasan)यांनी मंगळवारी बेंगळुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला आणि आज, बुधवारी त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. तर त्याचे एका दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे. थक्काली श्रीनिवास यांनी एक यशस्वी निर्माता म्हणूनही ‘इवारस वरुंगलाथूंगल,’ ‘मनसुकल मठप्पू,’ ‘नालाई मणिथन,’ आणि ‘अधिसया मणिथन’ असे संस्मरणीय चित्रपट पडद्यावर आणले. निर्मितीव्यतिरिक्त, दिग्दर्शनातही त्यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांनी “जेन्मा नटचथिरम,’ विटनेस,’ “अशोकवनम,” आणि “अदुथुट्टु” सारखे चित्रपट कुशलतेने दिग्दर्शित केले.
थक्काली श्रीनिवास यांनी पडद्यामागील भूमिका करण्यासोबतच अभिनयातही आपली छाप सोडली आहे. त्यांनी ‘सूरसमहारम,’ ‘सिरायल सिला रागंगल,’ ‘जेन्मा नटचथिरम,’ आणि ‘नालाई मनिथन’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. त्यांच्या अभिनय शैलीत एक नैसर्गिक सहजता होती जी त्यांना इतर कलाकारांपेक्षा वेगळी ठरवत होती. थक्काली श्रीनिवास यांचे जीवन केवळ ग्लॅमरपुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी स्वतःला मानवतावादी सेवेसाठी पूर्णपणे समर्पित केले. त्यांनी एक आश्रम चालवला जिथे ते त्यांच्या दत्तक मुलांची काळजी घेत असत.
पुन्हा रंगणार कॉमेडीचा मेळा, चीन-दुबई कनेक्शनसह, वेलकम 4 चित्रपट धमाल करण्यासाठी होतोय सज्ज
Comments are closed.