री-रिलिझ 2025; फ्लॉप ठरलेला चित्रपट झाला ब्लॉकबस्टर, नव्या फिल्मचीही बदलली किस्मत – Tezzbuzz
रोमँटिक चित्रपटांची जादू प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत असते. काही चित्रपट मोठे ब्लॉकबस्टर ठरतात, तर काही फ्लॉप होऊनही वर्षानुवर्षे चर्चेत राहतात. 2025 हे वर्ष रोमँटिक म्युझिकल चित्रपटांसाठी खास ठरले. अनेक नव्या प्रेमकथा, संगीतमय फिल्म्स आणि जुन्या हिट चित्रपटांच्या री-रिलिझने बॉक्स ऑफिसवर वेगळाच माहोल निर्माण केला. यामध्ये 2016 मध्ये प्रदर्शित झालेला हर्षवर्धन राणे (Harsh Vardhan Rane)आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसैन यांचा ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पुन्हा केंद्रस्थानी आला.
सनम तेरी कसम मधील हर्षवर्धन आणि मावरा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. मात्र, कथानक पटले नसल्याने त्यावेळी हा चित्रपट गाजला नाही. पण 7 फेब्रुवारी 2025 रोजी री-रिलिझ झाल्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलली. चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने दमदार कमाई केली. ‘सनम तेरी कसम’ एवढा लोकप्रिय झाला की त्याच्या रीमेकची मागणी सुरू झाली. यानंतर मिलाप झवेरी दिग्दर्शित हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या ‘एक दीवाने की दीवानियत’ हा चित्रपट 21 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः तहलका माजवला.
‘सनम तेरी कसम’ची री-रिलिझ 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारी री-रिलिझ फिल्म ठरली. भारतात आणि जगभरात मिळून या चित्रपटाने तब्बल 41 ते 50 कोटींची कमाई केली. त्यामुळे याने मूळ 2016 च्या कलेक्शनलाही मागे टाकले, तसेच ‘तुम्बाड’सारख्या री-रिलिझ झालेल्या चित्रपटांनाही मागे सोडले.
‘एक दीवाने की दीवानियत’ हा 2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला हिट रोमँटिक चित्रपट ठरला. सुमारे 25 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करून वर्षातील टॉप कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून नाव नोंदवले. रोमँटिक फिल्म्सची क्रेझ किती प्रचंड आहे, याची साक्ष ही दोन्ही चित्रपटांनी पुन्हा एकदा दिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सोनाक्षी–जहीरच्या नात्यात लग्नाआधी तणाव; भांडण इतके वाढले की केस उपटण्याची आली होती वेळ
Comments are closed.