झोपडपट्टीत जन्मलेला ‘मदर इंडिया’चा बिरजू; दिग्दर्शकाने दत्तक घेऊन एका झटक्यात घडवला स्टार – Tezzbuzz
‘मदर इंडिया’चा उल्लेख झाला की नरगिस दत्त, राजकुमार आणि सुनील दत्त यांची नावे हमखास आठवतात. मात्र या अजरामर चित्रपटात एक असा कलाकार होता, ज्याने बालवयातच प्रेक्षकांची मने जिंकली होती. तो म्हणजे ‘छोटा बिरजू’ साकारणारा अभिनेता साजिद खान. (Sajid Khan)मुंबईच्या झोपडपट्टीतून निघालेला हा मुलगा पुढे थेट हॉलीवूडपर्यंत पोहोचला आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली.
साजिद खान यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखीच वाटते. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलाला दिग्गज दिग्दर्शक महबूब खान यांनी महबूब स्टुडिओबाहेर पाहिले. त्याचा आत्मविश्वास, चपळपणा आणि निरागसपणा पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी ‘मदर इंडिया’साठी त्याची निवड केली. सुनील दत्त यांच्या बिरजूच्या बालपणीच्या भूमिकेसाठी योग्य चेहरा म्हणून साजिद निवडला गेला.
‘मदर इंडिया’च्या शूटिंगदरम्यान महबूब खान आणि त्यांची पत्नी सरदार अख्तर यांना साजिदवर अपार प्रेम जडले. पुढे त्यांनी त्याला दत्तकही घेतले. साजिदच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी त्याला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. अशा प्रकारे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.
१९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’मधील अभिनयामुळे साजिद खान चांगलेच लोकप्रिय झाले. त्यानंतर १९६२ मध्ये महबूब खान यांच्या अखेरच्या चित्रपटात — ‘सन ऑफ इंडिया’ — त्यांनी मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटातील “नन्हा मुन्ना राही हूँ” हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. जरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही, तरी साजिदच्या अभिनयाचे कौतुक झाले.
महबूब खान यांच्या निधनानंतर सरदार अख्तर यांनी साजिदला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. तेथेच १९६6 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माया’ या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका मिळाली. या चित्रपटामुळे साजिद आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले. याच नावावर आधारित एक टीव्ही मालिका देखील तयार झाली, जी सप्टेंबर १९६७ ते फेब्रुवारी १९६८ दरम्यान NBC वर प्रसारित झाली. १८ भागांच्या या मालिकेमुळे साजिद ‘टीन आयडल’ बनले आणि अनेक प्रसिद्ध मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकले.
साजिद खान यांनी दोन विवाह केले होते. पहिल्या विवाहापासून त्यांना समीर नावाचा मुलगा आहे. पुढील काळात ते केरळमध्ये स्थायिक झाले आणि दुसरे लग्न केले. चित्रपटसृष्टीपासून दूर राहून त्यांनी समाजसेवेचे काम सुरू केले. दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर २२ डिसेंबर २०२३ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
झोपडपट्टीत जन्म घेऊन ‘मदर इंडिया’सारख्या ऐतिहासिक चित्रपटातून स्टार बनणे आणि पुढे हॉलीवूडपर्यंत मजल मारणे साजिद खान यांची जीवनकहाणी आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘उल्फत’च्या आयुष्यातील खरा प्रेमवीर कोण? IITमध्ये जुळली जोडी, IIMपर्यंत पोहोचले नाते
Comments are closed.