हिना खानचं अचानक लग्न! कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! – Tezzbuzz

हिना खान (Hina Khan) तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या खासगी आयुष्यासाठी चर्चेत असते. अलीकडेच तिनं लग्न घाईघाईत का केलं, याचं कारण सांगितलं आहे. हे ऐकून तिचे चाहते खूपच आश्चर्यचकित झालेत.

हिना खाननं काही महिन्यांपूर्वी रॉकी जायसवालसोबत लग्न केलं. तिनं सोशल मीडियावर फोटो टाकून ही बातमी चाहत्यांना दिली. जेव्हा हे फोटो बाहेर आले,तेव्हा सगळेच चकित झाले. त्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या अंदाज लावायला सुरुवात केली.सुरुवातीला लोक म्हणाले की हिना आणि रॉकीनं फक्त एका शोसाठी लग्न केलंय. मग काही जणांनी असंही सांगितलं की हिना प्रेग्नंट आहे म्हणून त्यांनी घाईत लग्न केलं. पण आता हिनानं या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हिनानं सांगितलं की लोक काय बोलतात, याची तिला अजिबात पर्वा नाही. ‘लाइव हिंदुस्तान’ ला दिलेल्या मुलाखतीत तिनं स्पष्ट केलं की तिनं शोसाठी रॉकीसोबत लग्न केलं नाहीये. तिनं सांगितलं की ती गेल्या वर्षीच रॉकीसोबत लग्न करणार होती, पण कॅन्सर झाल्यामुळे ते शक्य झालं नाही. हिनानं सांगितलं की जेव्हा तिला शो मिळाला, तेव्हा तिनं मेकर्सना सांगितलं की तिचं अजून लग्न झालं नाहीये आणि शोचं नावच आहे ‘पति, पत्नी और पंगा’. तेव्हा मेकर्स म्हणाले,”तुम्ही साखरपुढा केली तरी चालेल, तरीही शोमध्ये राहू शकता”. पण हिनानं ते नाकारलं. त्यामुळे तिला आणि रॉकीला बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड म्हणूनच शोमध्ये घेतलं. हिनानं असंही सांगितलं की लग्नाचा निर्णय तिनं एकदम अचानक घेतला, आधीच काही ठरवलेलं नव्हतं.

हिनानं सांगितलं की तिच्या लग्नाचा शोशी काहीही संबंध नाही. पण जेव्हा तिनं लग्न केलं, तेव्हा शोचे मेकर्स खूप खुश झाले. लग्नाआधी हिना आणि रॉकी एकमेकांना 13 वर्षं डेट करत होते, आणि त्यांनी जूनमध्ये लग्न करून सगळ्यांना सरप्राइज दिलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘द केरळ स्टोरी’ ला दोन राष्ट्रीय पुरस्कार का मिळाले? आशुतोष गोवारीकर यांनी दिली पूर्ण माहिती…

Comments are closed.