अगस्त्य नंदा–सिमर भाटिया यांच्या ‘इक्कीस’ची दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई – Tezzbuzz

अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा यांनी २०२६ सालातील पहिल्या चित्रपटातून म्हणजेच ‘इक्कीस’मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच तो चर्चेत होता आणि स्टारकिड म्हणून अगस्त्यच्या अभिनयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा ऑन-स्क्रीन अभिनय ठरला आहे, त्यामुळे हा वॉर ड्रामा अधिक भावनिक ठरत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सिंगल डिजिटमध्ये सुरुवात केली असून आता त्याची कमाई आणि ऑक्युपन्सी समोर आली आहे.

अगस्त्य नंदा (Agastya Nanda)स्टारर हा वॉर ड्रामा सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘इक्कीस’ ने ओपनिंग डे ला सुमारे ७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पदार्पण करणारे कलाकार आणि गंभीर विषय असूनही ही सुरुवात चांगली मानली जात आहे. याच काळात प्रदर्शित झालेल्या रोमँटिक चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ ने पहिल्या दिवशी ७.७५ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे पुढील दिवसांत ‘इक्कीस’ची कामगिरी कशी राहते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.धर्मेंद्र यांच्या अखेरच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून, १ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटाची एकूण हिंदी ऑक्युपन्सी ३१.९४% नोंदवण्यात आली आहे.

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ हा चित्रपट १९७१ च्या भारत–पाक युद्धात शौर्य गाजवणारे शहीद अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. देशासाठी बलिदान दिल्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आले होते. या चित्रपटात अगस्त्य नंदा, धर्मेंद्र, जयदीप अहलावत, सिमर भाटिया, सिकंदर खेर, श्री बिश्नोई आणि एकावली खन्ना यांच्या भूमिका आहेत. धर्मेंद्र यांना मोठ्या पडद्यावर अखेरच्या वेळी पाहणे प्रेक्षकांसाठी भावनिक अनुभव ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

साऊथच्या हिट हॉरर थ्रिलरचा जलवा कायम, दोन भागांनी कमावले मोठे बॉक्स ऑफिस,तर तिसऱ्या भागाचा पहिला लूक व्हायरल

Comments are closed.