हास्याची नवी लहर; ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा टीझर प्रदर्शित २४ जानेवारीपासून एव्हरेस्ट हास्य मराठी यूट्यूब चॅनेलवर.. – Tezzbuzz
काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या शो विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली.
‘ऑलमोस्ट कॉमेडी’मध्ये, लेखक चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज लेखक, प्रत्यक्ष स्टेजवर येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. याआधी त्यांच्या लेखणीतून साकारलेली हास्यनिर्मिती आपण पाहिली आहे, आता त्यांचा स्टेजवरील धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. आपल्या दिलखेच अंदाजात सूत्रसंचलन करून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर या शोची रंगत वाढवणार!
पाच लेखकांचे पाच एपिसोड्स रसिकवर्गाला पाहायला मिळणार असून येत्या २४ जानेवारीला ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा पहिला एपिसोड एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी नवीन एपिसोड प्रदर्शित होईल. या पाच एपिसोड्स व्यतिरिक्त एक एपिसोड नक्कीचं खास ठरेल, कारण प्रियदर्शनी इंदलकर सुत्रसंचलनाबरोबर लेखकांना रोस्ट देखील करणार आहे. या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना रोस्टिंगचे अनकट सीन पाहायला मिळणार आहेत. आता आठवड्याचा प्रत्येक शुक्रवार हा प्रेक्षकांसाठी हास्याचा खास दिवस ठरेल यात शंकाच नाही.
एव्हरेस्ट एंटरटेमेंटचे संस्थापक संजय छाब्रिया म्हणतात , ” ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा मराठी मनोरंजनक्षेत्रातील प्रतिभावान लेखकांचा स्टेजवरील लाईव्ह परफॉर्मन्सचा नवीन प्रयोग आहे. जो प्रेक्षकांना खळखळून हसवेल. तसेच त्यांच्या विनोदी अंदाजातील वैविध्यही यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. एव्हरेस्ट हास्य मराठी हा प्लॅटफॉर्म आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, ज्यातून आम्ही नव्या कलाकारांना आणि त्यांच्या कलेला रसिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. या शोमध्ये फक्त कॉमेडीच नाही तर रोस्टिंगसारखे अनोखे फॉरमॅट देखील आहेत. यापुढे ही असेच अनेक नवनवीन एपिसोड्स तुम्हाला पाहायला मिळतील. आम्हाला खात्री आहे, की ऑलमोस्ट कॉमेडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि रसिकवर्ग हा शो एन्जॉय करतील.”
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली,” मला जेव्हा अमोलचा फोन आला की, आम्ही एक शो करतोय आणि तुला या शोचे होस्टिंग करत या लेखकांना रोस्ट करायचे आहे. मी खूप आश्चर्यचकित झाले, इतके मोठे, अनुभवी कलाकार असूनही त्यांनी मला फोन केला. मी याला एक चांगली संधीच म्हणेन. कारण या आधी मी कधी अशा प्रकारचे काम केले नाही. स्टँडअप हा प्रकार मला ट्राय करायचा होता आणि या शोच्या निमित्ताने मला याचा अनुभव घेता आला. सगळ्यांनी मला या प्रवासात खूप सांभाळून घेतले. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि संजय छाब्रिया यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ही संधी दिली. आता हा आमचा प्रवास अजून लांबपर्यंत चालणार असून अजून जास्त लोकांपर्यंत हे आम्ही पोहोचवणार आहोत.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो आला समोर; १५ वर्षीय पोरगा वाटतो हल्लेखोर…
Comments are closed.