काय आहे ‘धुरंधर 2’मधील जसकीरत सिंग रंगीची खरी कहाणी? घ्या जाणुन – Tezzbuzz
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती.
‘धुरंधर: द रिव्हेंज’, जो ‘धुरंधर 2’ म्हणूनही ओळखला जातो, हा चित्रपट जसकिरत सिंग रंगीची जीवनकथा सांगतो. हा ‘धुरंधर’ मालिकेतील दुसरा भाग असून, यात रणवीर (Ranveer)सिंगने जसकिरत उर्फ हमजा अली माझारीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेत्याने एका गुप्तहेराची भूमिका केली आहे, जेव्हा जसकिरत 21 वर्षांचा होता, तेव्हा तो भारतीय सैन्यात भरती होण्याची तयारी करत होता. त्याचे वडील लष्करी अधिकारी होते. कुटुंबात त्याची आई, वडील आणि दोन बहिणी होत्या. थकबाकी न भरल्यामुळ जसकिरतच्या वडिलांची हत्या झाली. तर एका बहिणीवर अमानुष अत्याचार करून, नंतर दुसऱ्या बहिणीवर बलात्कार झाला पण ती कशीतरी वाचली. आणि यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. जसकिरतचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला, त्याने स्वतःच सूड घेण्याचे ठरवले.
‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या शेवटी, हमजाची पुर्ण कथा दाखवण्यात आली आहे. हमजा यालिना आणि मुलगा झैन यांना मागे सोडून भारतात सुखरूप परत येतो. तो आपल्या आई, बहीण आणि दोन मुलांना त्यांच्या आयुष्यात स्थिरावलेले पाहतो. आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये जसकिरत लष्करी छावणीत आपले प्रशिक्षण पुन्हा सुरू करताना दिसतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.