तिहेरी तलाकवर जावेद अख्तरांची खरमरीत टीका, म्हणाले बदलासाठी सरकारची वाट का पाहायची? – Tezzbuzz

जावेद अख्तर हे एक लोकप्रिय लेखक आहेत. तसेच ते बॉलीवूड गीतकार ही असुन ते त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच ओळखसले जातात.  ते अनेकदा सामाजीक विषयांवर उघडपणे बोलतात. नुकताच एका मुलाखतीत त्यांनी मुस्लिम समाजातील सुधारणांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. तात्काश तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, मुस्लिम वैयक्तिक कायद्दतील आवश्यक बदल समाजातच का केले गेले नाहीत आणि सरकारी हस्तक्षेपाची का पाहावी… यावेळी त्यांनी असे अनेक प्रश्न उपस्थित केले.

या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जावेद (javed)अख्तर यांनी सांगितले की, मुस्लिम वैयक्तिक कायदा 1937 मध्ये अस्तित्वात आला आणि भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर बराच काळ ही व्यवस्था बदलण्यासाठी कोणताही पुढाकार का घेतला गेला नाही, असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले सामाजिक प्रथेमध्ये सुधारणेची गरज असेल तर ती समाजातुनच सुरु व्हायला हवी होती.

जावेद अख्तर यांनी समाजतील सुधारणांबाबतच्या विषयांवर भर देत टिका केली. ते म्हणाले की, भारतातील फॅसिझम आणी जातीवादाविरुद्ध आवाज उठवले जातात, परंतु मुस्लिम समाजातील कट्टरतावाद आणि सनातनी विचारांविरुद्द बाोलण्यास कमी लोक तयार आहेत.

जावेद अख्तर यांनी सामाजिक राजकीय आणि जातीय सलोख्याशी संबंधित मुद्द्यांवर आपली स्पष्ट मते नेहमीच व्यक्त केली आहे. तसेच आता केलेल्या तिहेरी तलाकवरील त्याचे वक्तव्य आणि समाजात सुधारणा घडवुन आणण्याच्या त्याच्या आवाहनामुळे तो पुन्हा सामाजिक चर्चेचा भाग बनला आहे.

हेही वाचा

दृश्यम 3 ने प्रेक्षकांना घातली भुरळ, क्लायमॅक्स पाहुन चाहत्यांनी या दिल्या भन्नट प्रतिक्रिया

Comments are closed.