करिष्मा तन्ना लवकरच होणार आई, सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी – Tezzbuzz
2026 मध्ये अनेक कलाकारांनी आनंदाची बातमी दिली आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला अनेक सेलिब्रिटींचे लग्न पार पडले. तसेच काहींच्या घरी नवीन पाहुण्याचं स्वागत झालं. तर अशीच एक गोड बातमी एका अभिनेत्रीने शेअर केली आहे. ती अभिनेत्री म्हणजे करिश्मा तन्नाने. ती आता लवकरच आई होणार आहे. ही बातमी ऐकताच चाहते आनंदित झाले आहेत. लग्नाच्या चार वर्षांनंतर ही गोड बातमी तिने दिली आहे. टीव्हीवरून ओटीटीवर पदार्पण केलेली ही सौंदर्यवती तिच्या गरोदरपणामुळे खूप आनंदी आहे आणि तिचा हा आनंद तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समधून स्पष्टपणे दिसून येतो.
करिश्मा तन्नाच्या या पोस्टमध्ये तिच्या पतीसोबत सुंदर आणि रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत, जे सर्वांची मने जिंकत आहेत आणि अभिनंदनाच्या संदेशांचा वर्षाव होत आहे. चित्रपट सुष्टीतील अनेक कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच करिश्माने इंस्टाग्रामवर फोटोंचा एक सुंदर कॅरोसेल शेअर केला आहे. या फोटोंमध्ये, हे जोडपे पालक झाल्याचा आनंद साजरा करताना दिसत आहे. फोटोंमध्ये, करिश्मा आणि वरुण बाळाच्या बुटांसोबत पोज देताना दिसत आहेत.
आपला आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘मॉम’ आणि ‘डॅड’ लिहिलेल्या खास टोप्याही घातल्या होत्या. करिश्माने फोटोंसोबत एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे, “एक छोटा चमत्कार, आमची सर्वात मोठी भेट ऑगस्ट 2026.” या कॅप्शनमध्ये तिने हे देखील उघड केले आहे की त्यांचे छोटे बाळ ऑगस्ट 2026 मध्ये या जगात येईल. करिष्मा (Karishma)तन्ना आणि वरुण बंगेरा यांचे नाते 2021मध्ये सुरू झाले. काही काळ डेटिंग केल्यानंतर, या जोडप्याने 5 फेब्रुवारी 2022 रोजी एका खाजगी समारंभात लग्न केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘धुरंधर 2’च्या गाण्यांवर भारी पडले 34 वर्षांपूर्वीचे गाणे, तर कल्ट सिंगरचा आवाज करतो आजुन भावूक
Comments are closed.