संजय कपूरच्या मृत्यूनंतर ३१ हजार कोटींची कंपनी कोण सांभाळणार? मुलगी समायरा की आणखी कोणी? – Tezzbuzz
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma kapoor) चा माजी नवरा संजय कपूर यांचं १२ जून २०२५ ला निधन झालं. यूकेमध्ये पोलो खेळताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आला. संजय कपूर यांची स्वतःची एक मोठी कंपनी होती, ज्याची किंमत जवळपास ३१ हजार कोटी रुपये आहे. त्यांच्या निधनानंतर आता लोकांना जाणून घ्यायचं आहे की, एवढा मोठा व्यवसाय पुढे कोण सांभाळणार?
संजय कपूर यांना भाऊ नव्हता आणि त्यांच्या वडिलांचं आधीच निधन झालं होतं. त्यांना दोन बहिणी आहेत – मंदिरा कपूर आणि सुपर्णा मोटवानी. त्यामुळे लोकांनी अंदाज लावायला सुरुवात केली की संजयची कंपनी बहुधा त्याच्या बहिणींपैकी कोणी तरी चालवेल. पण अजूनपर्यंत ना कंपनीकडून, ना त्यांच्या कुटुंबाकडून याबाबत काहीही सांगितलं गेलेलं नाही.
साधारणपणे कोणाचं निधन झालं की त्याची मालमत्ता, घर आणि व्यवसाय मुलांनाच मिळतो आणि तेच पुढे तो सांभाळतात. संजय कपूर यांना तीन मुले आहेत – एक्स वाइफ करिश्मा कपूरपासून त्यांना एक मुलगी समायरा (२० वर्षांची) आणि मुलगा किआन (१४ वर्षांचा) आहे. तिसऱ्या बायको प्रिया सचदेवापासून त्यांना एक ६ वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे आता असा सवाल उठतोय की, संजयची मोठी मुलगी समायरा त्यांच्या कंपनीची जबाबदारी घेऊ शकेल का? कारण ती तिन्ही मुलांमध्ये सर्वात मोठी आहे आणि आता ती मोठी (बालिग) झाली आहे.
संजय कपूर यांच्या सोना कॉमस्टार कंपनीने यावर स्पष्ट सांगितलं आहे की, सध्या त्यांच्या तिन्ही मुलांपैकी कोणीही कंपनी संभाळण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे आता कंपनीचा नवा चेअरमन कोण होईल, हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एकत्र बसून ठरवणार आहेत. आत्ताच्या घडीला कंपनीचं कामकाज मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ विवेक विक्रम सिंह पाहत आहेत.संजय कपूर हे सोना कॉमस्टार या कंपनीचे चेअरमन होते. ही कंपनी त्यांच्या वडिलांनी – डॉ. सुरिंदर कपूर यांनी सुरू केली होती. गुरुग्राममध्ये असलेली ही कंपनी गाड्यांचे पार्ट्स बनवण्याचं काम करते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘रेडी’ चित्रपटात जेनेलियाला न घेतल्याबद्दल आली अभिनेत्रीची प्रतिक्रिया, ऐकून सलमान खान होईल खुश
आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये दिसणार मुलगा जुनैद खानच्या आगामी सिनेमाचा टिझर
Comments are closed.