अभिनेत्री कियारा अडवाणीने सासऱ्यांच्या निधनानंतर शेअर केली भावनिक पोस्ट… – Tezzbuzz

सिद्धार्थ मल्होत्रा हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. तर नुकतेच त्याच्या वडीलाचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचे वय सध्या 80 होते. 17 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ही माहिती सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केली. आता, कियारा अडवाणीनेही तिच्या दिवंगत सासऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कियारा यांनी त्यांच्यासोबत घालवलेल्या काही सुंदर क्षणांची आठवणीचे फोटो शेअर केले आहेत.

कियारा (kiara)अडवाणीने इंस्टाग्रामवर तिचा आणि सिद्धार्थच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे सासरे सुनील मल्होत्रा ​​आणि सासूही दिसत आहेत. ते सर्व फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये सुनील मल्होत्रा ​​देखील दिसत आहेत. हे ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या दिवंगत सासऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

फोटो शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या सासऱ्यांबाबत भावना व्यक्त केले “सुरुवातीपासूनच, तुम्ही मला मोकळ्या मनाने मिठी मारली.” असे लिहिले. तुम्ही मला एका निःशर्त प्रेमाने स्वागत केलेस ज्याने आम्हा सर्वांना आधार दिला. तुमचे प्रेम अफाट होते. त्यात उदारता सहजतेने होती. कुटुंबावरील तुमचे प्रेम, केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी होते. जेव्हा कुटुंबात्यांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही नेहमीच तिथे असायचा. आणि त्या बदल्यात काहीही अपेक्षा केले नाही.

कियाराने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “तुमच्या कथा, हास्य, शांत धैर्य आणि तुमचे प्रेमळ शब्द माझ्या हृदयात कायमचे कोरले आहेत. तुम्ही कोमलता, प्रामाणिकपणा आणि प्रेमाचा वारसा मागे सोडता आहात. ते तुमच्या मुलांमध्ये, नातवंडांमध्ये आणि तुम्हाला ओळखण्याचा बहुमान मिळालेल्या आपल्या सर्वांमध्ये कायमचे जिवंत राहील. शांती लाभो. तुम्हाला नेहमीच आठवणीत ठेवले जाईल, नेहमीच प्रेम केले जाईल.

मंगळवारी सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्रामवर त्याच्या वडिलांचे फोटो शेअर केले आणि त्याच्या वडिलांच्या निधनाची घोषणा केली. त्याने त्याच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटो शेअर केले. एका संदेशमय पोस्टद्वारे त्याच्या दिवंगत वडिलांची आठवण काढली. त्याच्या पोस्टनंतर, चित्रपटसृष्टीतील त्याच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी कमेंट करून अभिनेत्याच्या दिवंगत वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन, झोपेतच जगाचा घेतला निरोप

Comments are closed.