इंडिगोच्या गोंधळाने किरण राव त्रस्त; टोकियोची ट्रिप रद्द, सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी – Tezzbuzz
इंडिगो एअरलाइन मागील पाच दिवसांपासून गंभीर ऑपरेशनल संकटातून जात आहे. देशातील अनेक प्रमुख विमानतळांवर उड्डाणे रद्द किंवा विलंबित झाल्याने लाखो प्रवासी अडचणीत आहेत. या गोंधळाचा फटका बॉलीवूड निर्माती आणि दिग्दर्शक किरण राव (Kiran Rao)यांनाही बसला आहे. इंडिगोच्या अव्यवस्थित वेळापत्रकामुळे त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास अक्षरशः कोलमडला.
किरण राव यांची टोकियोला जाण्याची योजना होती. परंतु इंडिगोच्या उड्डाणात सतत होणाऱ्या विलंबांमुळे त्या जवळपास १७ तासांपासून मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 मध्येच अडकून पडल्या. घरातून निघाल्यानंतर तासन्तास उलटूनही त्यांना पुढील उड्डाणाची कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. या परिस्थितीचा संताप व्यक्त करत किरण राव यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत इंडिगोवर अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यांनी लिहिले की, घरातून बाहेर पडून ११ तास झाले, पण अजूनही आम्ही कुठेच पोहोचलेलो नाही. एअरलाइनकडून ठोस माहिती न मिळाल्याने प्रवाशांचीच गैरसोय होत आहे.
इंडिगो संकटामुळे देशभरातील प्रवाशी मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. अनेकांना तासन्तास विमानतळांवरच थांबावे लागत आहे. उड्डाणांच्या विलंबाबद्दल स्पष्ट माहिती न दिल्यामुळे प्रवाशांचा संतापही वाढत आहे. किरण रावसह हजारो प्रवाशांचे प्लॅन या अव्यवस्थेमुळे बिघडले आहेत.
किरण राव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी अभिनेता आमिर खानसोबत 2005 मध्ये विवाह केला होता. 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांचा मुलगा आजाद सध्या आमिरसोबत राहतो. गेल्या वर्षी किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
गलवान सेतुर सलाम-चित्रांगदाचा कॉन्ड्रेस लष्कराच्या इंधनासह दिसला, फोटो व्हायरल
Comments are closed.