देश स्वतंत्र व्हायच्या आधीच ‘किस्मत’ ने केला 1 काेटीचा धमाका !

देशाला स्वातंत्र्य मिळायच्या अधीच ‘किस्मत’ या चित्रपटाने तब्बल 1 काेटी रुपये कमावले हाेते, आणि त्यामुळे ताे ब्लॉकबस्टर ठरला हाेता.

आताच्या काळात एखादा चित्रपच 100 काेटी कमावला, की त्याला ब्लॉकबस्टर म्हणतात. पण आधीच्या काळात असं नव्हतं. 60 च्या दशकात जर एखाद्या चित्रपटाने 1 काेटी कमावले, तरी ते खूप माेठं मानलं जायचं. पण आश्चर्याची गाेष्ट म्हणजे, जेव्हा आपला देश अजून स्वतंत्रही झाला नव्हता, तेव्हाच एक चित्रपट 1 काेटींपेक्षा जास्त कमावून गेला हाेता! त्या चित्रपटाच नाव हाेतं ‘किस्मत’, आणि ताे 1943 साली प्रदर्शित झाला हाेता. या चित्रपटाच यश मुख्यतः त्याच्या संगितामुळे हाेतं, आणि ते दिलं हाेतं अनिल विश्वास यांनी.

या चित्रपटासाठी अनिल विश्वास यांनी दिलेलं संगीत लाेकांच्या हृदयाला अगदी भिडलं. ‘आज हिमालाय की चाेटी से…’ हे देशभक्तीचं गाणं ऐकून लाेकांच्या अंगात देशप्रेम संचारलं, आणि ‘धीरे धीरे आ रे बादल…’ सारखी गाेडशी धून सगळ्यांच्या मनात घर करुन गेली.

अनिल विश्वास यांचा जन्म 7 जुलै 1914 राेजी पूर्व बंगालमधल्या (आजचा बंगलादेश) बरीसाल या गावात झाला हाेता. त्यांना लहानपणासूनच गाण्याची खूप आवड हाेती. ते तरुणपणीच स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले हाेते, आणि त्यासाठी त्यांना जेलमध्येही जावं लागलं हाेतं. अनिल विश्वास कामासाठी मुंबईला आले आणि सुरूवातीला त्यांनी कलकत्तामधल्या काही चित्रपटांसाठी संगीत तयार केलं, पण त्यांना खरी ओळख ‘बाॅम्बे टाॅकीज’ मधून मिळाली. ते फक्त चांगल्या गाण्यांसाठीच ओळखले गेले नाहीत, तर त्यांनी चित्रपटसंगीताचीच दिशा बदलून टाकली.

‘किस्मत’ या चित्रपटाच्या यशानंतर अनिल विश्वास यांना हिंदी सिनेसृष्टीतल्या माेठ्या संगीतकरांमध्ये गणलं जाऊ लागलं. त्यांनी मुकेश, तलत महमूद, लता मंगेशकर, मीना कपूर आणि सुधा मल्होत्रा यांसारख्या गायकांना पहिला ब्रेक दिला आणि ओळख निर्माण करून दिली. त्यांनी गझल, ठुमरी, दादरा, कजरी आणि चैती यांसारख्या उपशास्त्रीय संगीतालाही चित्रपटांत स्थान दिलं.

1940 आणि 50च्या दशकात अनिल विश्वास यांचं संगीत सगळीकडे ऐकायला मिळत होतं. त्या वेळी गाणी साधी आणि सोपी असायची, पण अनिलदा यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये भावना, खोली आणि नवे रंग भरले. आजही त्यांची गाणी ऐकली की ताजी आणि वेगळी वाटतात. ‘अनोखा प्यार’, ‘आरजू’, ‘तराना’, ‘आकाश’, ‘हमदर्द’ या चित्रपटांमधलं त्यांचं संगीत खूपच सुंदर आणि वेगळं होतं. त्यांनी एक ‘रागमाला’ नावाचा खास प्रयोगही केला होता, एकाच गाण्यात चार वेगवेगळे राग जोडले. त्या काळात असं काही कुणीच केलं नव्हतं!

अनिल विश्वास यांनी 1965 साली आलेल्या ‘छोटी छोटी बातें’ या चित्रपटासाठी शेवटचं संगीत दिलं. या चित्रपटानंतर त्यांच्या सोबत असलेल्या काही कलाकारांच्या कहाण्याही थांबल्या. या चित्रपटातली गाणी, ‘जिंदगी ख्वाब है…’, ‘कुछ और जमाना कहता है…’ ही त्यांच्या विचारशील आणि वेगळ्या धाटणीच्या संगीताची उदाहरणं होती. जरी या चित्रपटाला मोठं यश मिळालं नाही, तरी त्याचं संगीत लोकांच्या मनात घर करून बसलं. चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यानंतर, अनिल विश्वास दिल्लीला राहायला गेले आणि त्यांनी आपलं लक्ष संगीत शिक्षणाकडे वळवलं. त्यांनी आकाशवाणी आणि संगीत नाटक अकादमीसारख्या संस्थांसोबत काम केलं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

नयनताराचा होणार घटस्फोट ? अभिनेत्रीने पती विषयी लिहिली अपमानास्पद पोस्ट…

पोस्ट देश स्वतंत्र व्हायच्या आधीच ‘किस्मत’ ने केला 1 काेटीचा धमाका ! प्रथम वर दिसले डेनिक बॉम्बबॉम्ब?

Comments are closed.