कोहरा 2 ; नेटफ्लिक्सवरील ६ भागांची क्राइम थ्रिलर मालिकाचा प्रत्येक भाग आहे हा सस्पेन्सने भरलेला – Tezzbuzz

जर तुम्हाला क्राईम थिलर या प्रकारच्या सिरीज चित्रपट आवडत असतील तर अशीच एक गूढ आणि उत्साहाने भरलेली बहुप्रतिक्षित वेब सिरीजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सला प्रदर्शित झाला आहे सहा एपिसोड्सची ही कहाणी आहे. तर ही कहाणी प्रेक्षकांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची क्षमता आहे. आपण बोलत आहोत धुके २ (Kohra 2 )या वेब सिरीज बाबत चला तर जाणून घेवुयात.

या सीझनची कथा पंजाबमधील दलेरपुरा या काल्पनिक गावातुन होते. बरुण सोबतीने साकारलेला अमरपाल गरुंडी, जगराणा येथील त्याचे जुने आयुष्य मागे सोडून नवीन पोस्टिंगसह तेथे पोहोचतो. त्याला त्याची पत्नी सिल्कीसोबत नवीन सुरुवात करण्याची आशा आहे. पण लवकरच या भागात एक खून प्रकरण समोर येते आणि कथेचा वळण बदलते. हे प्रकरण एनआरआय प्रीतच्या हत्येशी संबंधित आहे, जी तिच्या पालकांच्या घरी मृतावस्थेत आढळते. या हत्येचा तपास करण्याचे काम एसआय धनवंत कौर (मोना सिंग) यांच्यावर सोपवण्यात आले आहे. सुरुवातीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. असे दिसून आले आहे की प्रीत गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या पती (रणविजय सिंगा) आणि दोन मुलांना सोडून ती पालकांसोबत राहत होती. तिचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण होत असते, तर या काळात तिचे तिच्या नृत्य प्रशिक्षकाशीही प्रेमसंबंध होत असते.

मजबूत लेखन, शक्तिशाली अभिनय असल्या कारणाने तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या मालिकेचा पहिला सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्तम क्राइम थ्रिलरपैकी एक मानला जात होता. नवीन सीझनमध्ये सहा भाग आहेत, प्रत्येक भाग एका अशा ट्विस्टसह संपतो जो प्रेक्षकांना पुढील भाग पाहण्यास भाग पाडतो. या मध्ये मोना सिंग आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत आहेत. तर रणविजय सिंघा, वरुण बडोला, इकवाली खन्ना, हरलीन सेठी, रेचल शैली, अर्जुन भल्ला, मुस्कान अरोड़ा आणि मंदीप घई यांच्याही भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

ह्या अभिनेत्रीने लग्नाच्या दोन वर्षांनंतर दिली गुड न्यूज, आता लवकरच बनणार आई

Comments are closed.