बहिणीच्या लग्नानंतर कृति सेनन भावूक; नुपूरसाठी लिहिली खास पोस्ट, भाऊजी स्टेबिन बेनचे केले मनापासून स्वागत – Tezzbuzz

कृति सेननची बहीण नूपुर सेनन आणि लोकप्रिय गायक स्टेबिन बेन यांचा विवाह 11 जानेवारी 2026 रोजी उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजांनी झालेल्या या लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. लग्नानंतर मंगळवारी मुंबईत मित्रपरिवार आणि बॉलिवूडमधील नामांकित सेलिब्रिटींसाठी भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं.

'कॉकटेल 2' फेम अभिनेत्रीचे आगमन क्रिती सॅनन (Kriti Sanon)हिनं आपल्या इन्स्टाग्रामवर नूपुर-स्टेबिनच्या लग्नातील काही खास आणि आतापर्यंत न पाहिलेल्या फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिनं बहिणीसाठी एक भावनिक नोट लिहिली असून त्यावर नूपुर आणि स्टेबिन दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

कृतिनं लिहिलं, “मी काय अनुभवतेय हे शब्दांत सांगणं कठीण आहे… अजूनही विश्वास बसत नाही… माझ्या लहान बहिणीचं लग्न झालं! मी 5 वर्षांची असताना तुला पहिल्यांदा कुशीत घेतलं होतं, आज तुला आयुष्यातील सर्वात सुंदर नवरी म्हणून पाहताना मन भरून येतंय. तुझ्या आयुष्याचा नवा आणि सुंदर अध्याय तुझ्या सर्वात उत्तम जीवनसाथीसोबत सुरू करताना पाहून खूप आनंद होतो.”

कृतिनं आपल्या भाऊजीसाठी मनापासून भावना व्यक्त केल्या. “स्टेबिन, गेली 5 वर्षं तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग आहात आणि दरवर्षी आमचं नातं अधिक घट्ट झालं आहे. आज मला केवळ एक भाऊजी नाही, तर आयुष्यभराचा भाऊ आणि मित्र मिळाला आहे. तुमचं दोघांचं लग्न पाहणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात भावूक आणि सुंदर क्षण होता. तुम्हा दोघांना आयुष्यभर आनंद आणि प्रेम लाभो.”

तसंच, बहिणीच्या निरोपाबद्दल भावना व्यक्त करताना कृति म्हणाली,“नूपुर, तू फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर राहणार असलीस तरी घर तुझ्याशिवाय खरंच रिकामं वाटतंय. आता तू दोन घरांत आनंद पसरवणार आहेस… लव्ह यू दोघांनाही!”

दरम्यान, नूपुर-स्टेबिनच्या लग्नात कृतिचा बॉयफ्रेंड कबीर बहिया देखील उपस्थित होता. कृति आणि कबीर बराच काळ एकमेकांना डेट करत असून, सध्या त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.नूपुर-स्टेबिनच्या लग्नानंतर कृतिनं व्यक्त केलेल्या या भावना चाहत्यांच्या मनाला भावून गेल्या असून, तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
कुरळे ब्रदर्सचा जल्लोष! १९ वर्षांनंतर ‘साडे माडे तीन’चे धमाकेदार रियुनिअन सेलिब्रेशन

Comments are closed.