कमर्शियल LPG सिलेंडरच्या टंचाईमुळे या प्रसिद्ध यूट्यूबरने बंद केले रेस्टॉरंट – Tezzbuzz
शोएब इब्राहिम हा एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. आणि त्याची बहीण सबा इब्राहिम ही आहे. तर ही सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. सबाने व्लॉग्समुळे प्रेक्षकांमध्ये विशेष चाहतावर्ग मिळवलेला आहे. तर तिचे एक ‘खुशमदीद’ या नावाचे रेस्टॉरंट आहे, आणि याबाबत तिने एक महत्वाची अपडेट दिले आहे. ती म्हणजे हे त्यांचे रेस्टॉरंट तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच तिने तिच्या व्लॉगमध्ये याचा खुलासा केला आहे. मात्र या बातमीमुळे चाहत्याना धक्का बसला आहे.
सबा (saba)इब्राहिमचे ‘खुशमदीद’ हा तिचा एक स्वप्नवत प्रकल्प होता. तसेच सबा इब्राहिमचे रेस्टॉरंट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. यापूर्वी, सबा तिच्या एका व्लॉगमधील क्लिप व्हायरल झाल्यामुळे वादात सापडली होती. त्या व्हिडिओमध्ये, तिचे कुटुंब एका वर्दळीच्या महामार्गाच्या कडेला बसून रमजानचा उपवास करताना दिसले होते. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर सुरक्षेबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली.
सबाने तिच्या व्लॉगमध्ये स्पष्ट केले की रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय का घेतला हे हि सांगितले आहे. तिने स्पष्ट केले की, गेल्या काही दिवसांपासून रेस्टॉरंटमध्ये गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. ज्यामुळे स्वयंपाकघर चालू ठेवणे अशक्य झाले होते. यामुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण झाला आणि त्यांना काही काळासाठी थांबावे लागले. सबा इब्राहिम यूट्यूबवरील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत खालिद नियाझसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. ती तिच्या व्लॉग्सद्वारे तिचे दैनंदिन जीवन, कौटुंबिक क्षण, प्रवासाचे अनुभव शेअर करते.
विवियन डिसेनाने दोन महिन्यांनंतर केले पुनरागमन, दुसऱ्या बाळाच्या आनंदाची दिली खुशखबर
Comments are closed.