जबरदस्त सस्पेन्सची क्राइम थ्रिलर, या चित्रपटाचे दोन्ही भाग हिट, तर आता OTT वर धडाकेबाज करणार एन्ट्री – Tezzbuzz
राणी मुखर्जी ही बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि ते गाजले सुद्धा आहेत. राणी मुखर्जीच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात या अभिनेत्रीने स्थान निर्माण केले आहे. तर ती सध्या तीच्या एका नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. आणि हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. तर या चित्रपटाला IMDb वर उत्तम रेटिंग मिळाले आहे. आणि चित्रपट म्हणजे क्राईम थ्रिलर “मर्दानी 3” आहे.
मर्दानी 3 हा चित्रपट 30 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तर आता तो 27 मार्च 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे. मर्दानी आणि “मर्दानी 2” हे चित्रपटदेखील नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
‘मर्दानी 3’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले आहे. तर यशराज फिल्म्स (YRF) च्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये राणी (rani)मुखर्जी निर्भय पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतत असून, तिच्यासोबत जानकी बोडीवाला आणि मल्लिका प्रसाद मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. जिस्सू सेनगुप्ता, अभिषेक बॅनर्जी आणि अर्चना पुरण सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिकांमुळे या क्राईम थ्रिलरचा प्रभाव वाढतो. राणी मुखर्जीच्या दमदार ‘मर्दानी’ फ्रँचायझीने बॉक्स ऑफिसवर स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
संजय दत्त अभिनीत ‘आखिरी सवाल’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
Comments are closed.