बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध बालकलाकार, ज्याने वयाच्या सहाव्या वर्षी मुंबईत घेतले होते स्वतःचं घर – Tezzbuzz
अनेक कलाकार हे चित्रपटसृष्टीत अगदी बालपणापासूनच कलाकार म्हणून काम केले, आसच एक बाल कलाकार म्हणजे मास्टर राजू. ज्याचे वयाच्या सहाव्या वर्षी मुंबईच्या एका आलिशान परिसरात एक आलिशान घर होते आणि दहाव्या वर्षी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. व जया बच्चन आणि धर्मेंद्र सारख्या कलाकारांसोबत काम केले, परंतु प्रौढपणी तो अपेक्षित उंची गाठू शकला नाही.
मास्टर राजूचे खरे नाव फहीम अजानी आहे. एकेकाळी, मास्टर राजू हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात जास्त मागणी असलेला बाल कलाकार होता, त्याला अनेकदा अमिताभ बच्चनपेक्षा जास्त काम मिळत असे. निर्माते त्यांच्या चित्रपटांमध्ये त्याच्या समावेशाची आतुरतेने वाट पाहत होते. मास्टर राजू मुंबईतील डोंगरी येथे राहत होते. तर त्यांची पार्श्वभूमीतून चित्रपटसृष्टीमधली नव्हती. त्यांनी प्रथम गुलजारच्या “परिचय” साठी ऑडिशन दिले आणि संजीव कुमार यांनी मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटासाठी त्यांची निवड झाली.
जेव्हा मास्टर राजू संजीव कुमार यांच्यासोबत “परिचय” मध्ये काम करत होते, तेव्हा ते त्यांना सर्वजण मास्टर राजू म्हणत असत, ज्यामुळे त्यांचे टोपणनाव मास्टर राजू पडले. काही लोक त्यांना सेटवर लड्डू असेही म्हणत असत, परंतु संजीव कुमार म्हणाले की मास्टर राजू हे नाव चांगले वाटत होते, म्हणून हळूहळू सर्वजण त्यांना मास्टर राजू म्हणू लागले
मास्टर राजू यांनी त्यांच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र आणि अनिल कपूर सारख्या स्टार्ससोबत काम केले.
मास्तर राजू (master raju)यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की ते एका वेळी तीन चित्रपटांचे शूटिंग करायचे, ज्यामुळे शूटिंगचे वेळापत्रक खूपच अवघड होते. त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही मोठ्या स्टारपेक्षा जास्त काम होते, ते तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करायचे. मास्टर राजू यांचे मानधन लवकरच 10,000 वरून 100,000 रुपयांपर्यंत वाढले. 1977 मध्ये, मास्टर राजू त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते आणि त्यांना 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त फी मिळत होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्लेबॅक सिंगिंग सोडून शिवभक्तीत रमले अरिजित सिंग, शिवरात्रीपूर्वी एक नवीन गाणे केले रिलीज
Comments are closed.