ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ वरील 8 एपिसोडची वेब सिरीज ठरली सुपरहिट, 7.2 IMDb रेटिंगने केला धमाका – Tezzbuzz
आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अशीच एक सिरीज म्हणजे पण नुकतीच प्रदर्शित झालेली ‘मटका किंग’ ही मालिका तिच्या रहस्यमय कथानकामुळे आणि 1960 च्या दशकातील मुंबईच्या अचूक चित्रणामुळे वेगळी आणि लोकप्रिय ठरली आहे.
पुढच्या सीझनची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा करून चाहत्यांचा उत्साह द्विगुणी केला आहे. तसेच या मालिकेची स्टार कास्ट ही उत्तम आहे. आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता विजय वर्माने ‘बृज भट्टी’च्या भूमिकेत पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले आहे. सट्टेबाजीच्या बाजाराचा बिनमुकुट राजा बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या माणसाचा लोभ, सत्तेची लालसा आणि धूर्तपणा विजयने उत्कृष्टपणे साकारला आहे. या मालिकेत कृतिका कामरा, साई (sai)ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव आणि गुलशन ग्रोव्हर यांसारखे दिग्यज कलाकार आहेत.
‘मटका किंग’च्या यशामागे एक प्रमुख कारण म्हणजे त्याच्या पटकथेतील वैविध्य आहे. ही केवळ जुगाराची कथा नाही, तर पडद्याआड राहून संपूर्ण शहरावर नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारण आणि गुन्हेगारीच्या साखळीलाही ती उघड करते. तर या मालिकेने खुप कमी वेळेत उत्तम यश मिळवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
दूरदर्शनचे काही धार्मिक शो, ज्यांची लोकप्रियता आजही आहे कायम
Comments are closed.