छोटा अभिताभ म्हणून मिळवली ओळख ,तर एकेकाळी होता सर्वात महागडा हा बालकलाकार – Tezzbuzz

चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक कलाकार आहे ज्यांनी सिने सृष्टीमध्ये आपले नाव प्रचंड गाजवले. 70 आणि 80 च्या दशकात, असाच एक व्यक्ती आहे ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपली छाप सोडली. अभिनेता अभिताभ बच्चन यांचे त्यावेळेस सर्वत्र नाव होते तर अजून एक  मुलगा जो त्याच्या अभिनयाने सर्वत्र प्रेक्षकांची मन जिंकत होता, तो मुलगा म्हणजे मयूर राज वर्मा. पण त्याला आज ही छोटा अभिताभ म्हणून ओळखले जाते.

जीवनात काही असे क्षण असतात की ते जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरतात. असच मयूर राज वर्माच्या  (Mayur raj verma)जीवनात “मुकद्दर का सिकंदर” हा चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटामध्ये वर्मा यानी अमिताभ बच्चन यांच्या पात्राचे लहानपणीच्या मुलाचे रोल केले होता. ती भुमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. या चित्रपटाने मयूरला रातोरात स्टार बनवले आणि तो दिग्दर्शकांचा आवडता बनला

मयूरची लोकप्रियता इतकी होती की तो त्याच्या काळातील सर्वात महागडा बाल कलाकार बनला. “लवारीस” या चित्रपटासह जवळजवळ प्रत्येक मोठ्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका मयूरने साकारली होती. त्यांची शरीरयष्टी आणि अभिनयशैली अमिताभ बच्चन यांच्यासारखीच होती की लोक त्यांना बच्चनचे खरे प्रतिबिंब मानू लागले.

चित्रपटांनंतर, मयूरने टेलिव्हिजन जगतातही आपली छाप पाडली. बीआर चोप्रांच्या कालातीत “महाभारत” मध्ये त्यांनी अभिमन्यूची शक्तिशाली भूमिका साकारली. मात्र, महाभारतासारख्या मोठ्या रंगमंचावर यश मिळवूनही, त्यांना अपेक्षित असलेले मोठे बॉलीवूड प्रकल्प मिळाले नाहीत.

जेव्हा बॉलीवूडमध्ये परिस्थिती कठीण झाली, तेव्हा मयूरने एक धाडसी निर्णय घेतला आणि अभिनयाच्या जगाला निरोप दिला. आज, मयूर राज वर्मा भारत सोडून वेल्सयेथे स्थायिक झाला आहे. तिथे, तो एक यशस्वी व्यापारी आहे आणि त्याची पत्नी नूरीसोबत “इंडियाना” हे प्रसिद्ध रेस्टॉरंट चालवतो. त्याची पत्नी तिथे एक प्रसिद्ध शेफ आहे. आज, मयूर अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसायीक आहे आणि तो आनंदी कौटुंबिक जीवन जगतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईल सिरीज मधील कलाकारांसोबत काढली सेल्फी

Comments are closed.