अनुपम खेर, कपिल शर्मा यांचेही मार्क्स उघड – “३८% – ४४% मिळाले होते!” – Tezzbuzz

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये 'आजकाल मेट्रो' (Metro In Dino) च्या स्टार्सनी त्यांच्या शिक्षणाबद्दल गप्पा मारल्या. सारा अली खान म्हणाली, “मी खूप शिकलेय!” तर फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हसत हसत म्हणाली, “मी 12वीतून ड्राॅपआउट आहे!” म्हणजे तिने 12वी च्या पुढे शिक्षण घेतलं नाही.

‘मेट्रो इन दिनों’ हे सध्या चर्चेत असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सध्या या चित्रपटाचे कलाकार जाेरदार प्रमाेशन करतायत. अलीकडेच सारा अली खान, आदित्या राॅय कपूर, पंकज त्रिपाठी, काेंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अली फजल, फातिमा सना शेख आणि दिग्दर्शक अनुराग बसु हे सगळे कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये आले हाेते.

तिथे सगळ्यांनी मस्त मजा केली. यावेळी शाेच्या सेटवरची एक क्लिपही शेअर झालीये, ज्यात हे सगळे कलाकार आपापल्या शिक्षणाबद्दल गमतीशीर गाेष्ट सांगताना दिसतात. ही गाेष्ट कपील शर्मा शाेमध्ये घडली. कपिलनं साराला विचारलं, “फिल्मी करिअर आधी तू काय करायचीस?” त्या वर सारा अली खान म्हणाली, “मी खूप अभ्यास करत हाेते. हिस्ट्री, पाॅलिटिकल सायन्स शिकले. खूपच शिकले मी !”

तेव्हा फातिमा सना शेखने लगेच तिचं कौतुक करत म्हटलं, “सारा खूपच शिकलेली आहे”. पण जेव्हा फातिमाच्या अभ्यासाविषय विचारलं, तेव्हा तिने मस्त प्रामाणिकपणे सांगितलं, “मी 12वीत फेल झाले आणि मग शिक्षण थांबवलं. मी नेहमीच फेल व्हायचे. 12वीत 55% माकर्स मिळाले.”

यानंतर अनुपम खेर सरांनी शाळेच्या आठवणी शेअर करत सांगितलं, “मला 12वीत फक्त 38% माकर्स हाेते”. तेव्हा कपिल म्हणाला, “पण तरी बघ ना, आज आपण सगळे इथे स्टेजवर आहाेत!”. कपिल शर्मानं साराला तिच्या हिमालय ट्रिप आणि स्पिरिच्युअल टूरबाबत गंमतीत चिडवलं. ताे म्हणाला, “हिला डाेंगर इतके आवडतात की शूटिंग संपलं की लगेच डाेंगरावर चढते. फक्त माझ्या शाेसाठीच खाली आलीये! काय गं, नवरा मागायला डाेंगरावर जातेस का?”

यावर सारा थाेडी हसत आणि गंमतीत म्हणली, “जर तसं असतं ना , तर माझ्यासाठी मुलांची रांग लागली असती!”. ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट 4 जुलैला (आज) थिएटरमध्ये येताेय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

१७ वर्षांपूर्वी दिला होता मोठा फ्लॉप; आता हे दोन्ही कलाकार पुन्हा येत आहेत एकत्र…

Comments are closed.