टॅाक्सिकच्या आधी रिलीज झालेल्या मोधा रात्रीचा ओटीटीवर धमाका, IMDB वर 8.8 रेटिंग – Tezzbuzz
मागील दोन महिन्यात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही चित्रपट म्हणजे टाॅक्सिक आणि हनुमान अंश, या चित्रपटाची रीलीज पुर्वीज बरीच चर्चा झाली. तसेच ‘हनुमान अंश’ने प्रदर्शनानंतर काही दिवस थिएटरवर वर्चस्व गाजवले आणि ते कायम ठेवले आहे. पण याच दरम्यान एक काॅमेडी चित्रपट रीलीज झाला होता. तो म्हणजे मोधा रात्री या काॅमेडी चित्रपटाने देखील रिलीज नंतर बरीच चर्चा निर्माण केली. तर आता हा चित्रपट ओटीटीवर येत असुन याची निर्मात्यांनी त्याच्या ओटीटी प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे.
मोधा रात्री हा काॅमेडी चित्रपट आता ओटीटी वर येण्यास सज्ज आहे. या बाबतची माहिती निर्मात्याच्या या चित्रपटाच्या पोस्टर पोस्ट करत शेअर केली आहे. या मध्ये त्यांनी 18 सप्टेंबर 2026 रोजी प्रदर्शित होईल असे सांगितले आहे. आणि त्याम्हाला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होईल.
मोधा (modha)रात्री या चित्रपटात कौटुंबिक दबावामुळे एकमेकांशी लग्न करण्यास भाग पडलेल्या दोन व्यक्तींची कथा आहे. आणि ही त्या दोघांभोवती कथा फिरते आणि त्यांचे नाते हळूहळू बदलते. तर तुम्हाला अशी कौटुंबीक, रहस्यामय कथा आवडत असेल तर हा चित्रपट नक्की पहा, तसेच राजा करुपसामी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. आणि या चित्रपटात ऋषिकांत आणि अनिश्मा अनलकुमार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ऋषिकांतसाठी देखील खास आहे, कारण मुख्य अभिनेता म्हणून हा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.8 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हे दर्शवते.
हेही वाचा
८ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतणार रश्मी देसाई, ऑफर्स का नाकारत होती याचा केला खुलासा
Comments are closed.