‘डकैत’चा टीजर आऊट; मृणाल ठाकूर आणि आदिवी शेषसोबत अनुराग कश्यपचा दमदार अंदाज – Tezzbuzz
मृणाल ठाकूर आणि आदिवी शेष अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डकैत’चा टीझर आज प्रदर्शित झाला असून, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल चर्चा रंगू लागली आहे. हा टीझर चित्रपटाची कथा, पात्रे आणि एकूणच मूड स्पष्ट करतो.
‘डकैत’चा १ मिनिट ३१ सेकंदांचा टीझर सध्या फक्त तेलुगू भाषेत रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांना अधिकृत हिंदी टीझरसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. टीझरची सुरुवात आदिवी सेशपासून होते. सुरुवातीला एक भावनिक प्रेमकथा दाखवली जाते, जी हळूहळू थरारक अॅक्शनमध्ये रूपांतरित होते.
आदिवी शेषचा प्रियकरापासून निर्भीड अॅक्शन हिरोपर्यंतचा प्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. मृणाल ठाकूर (Mrunal Thakur )नेहमीप्रमाणे आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने लक्ष वेधून घेते. टीझरमध्ये अनुराग कश्यप, प्रकाश राज आणि अतुल कुलकर्णी यांचीही झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे, टीझरचा शेवट अनुराग कश्यपवर होतो, जे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
शनिल देव दिग्दर्शित ‘डकैत’ हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच दिवशी ‘धुरंधर’ भाग २ आणि यशचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ हे दोन मोठे चित्रपटही रिलीज होत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात यापैकी कोणत्याही चित्रपटाची रिलीज तारीख बदलते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.एकूणच, ‘डकैत’चा टीझर पाहता हा चित्रपट प्रेम, अॅक्शन आणि थरार यांचा जबरदस्त मेळ ठरणार असल्याचे स्पष्ट होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
चित्रपट फ्लॉप ठरला तरी कपिल शर्माचा शोचा चौथा सीझन ठरणार हिट? प्रियांका चोप्रासोबत रंगणार धमाल
Comments are closed.