राजकीय सन्मानाने होणार आशा भोसले यांचा अंत्यसंस्कार, आशाजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहोचले सेलिब्रिटी – Tezzbuzz

आशा भोसले हे एक प्रसिद्ध गायिका होत्या. त्याचे 12 एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले. त्याच्या जाण्याने त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, वयानुसार मल्टीपल ऑर्गन फेलियर झाल्याने  त्यांचे निधन झाले. तर आशा जी यांची नातजनाई भोसले यांनी सोशल मीडियावर सांगितले की, छातीचा संसर्ग आणि तीव्र थकवा आल्यामुळे त्यांना एक दिवस आधी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची थोड्यावेळाने त्याची निधनाची वार्ता समोर आली.

दरम्यान, संगीतकार ए. आर. रेहमान (rahman)यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन प्रसिद्ध गायिका आशा भोसले अखेरचा निरोप दिला. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी मि़डीयाला सांगितले की, लोक सकाळी 11 वाजल्यापासून लोअर परेल येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन अखेरचा निरोप देऊ शकतात. तर  प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आणि उर्मिला मातोंडकर यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. या दोघींसोबत चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील इतर अनेक सदस्यांनीही शोक व्यक्त केला आणि त्यांना अखेरचा निरोप दिला.

संगीत क्षेत्रातील दिग्गज ए. आर. रहमान चित्रपट सुर्ष्टितले अनेक कलाकार आता आशा भोसले यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी पोहोचले. तर आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. आनंद भोसले यांनी माहिती दिली की, आशा भोसले यांच्यावर सोमवारी दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंतिम दर्शनसाठी कासा ग्रांदे इमारतीमध्ये सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

निखळ सूर हरपले! वयाच्या ९२ व्या वर्षी आशा भोसले यांनी घेतला अंतिम श्वास

Comments are closed.