‘बालिका वधू’ची गहना आता बिझनेसवुमन; ‘शार्क टैंक इंडिया’मध्ये ब्रँडसह घेतली एंट्री – Tezzbuzz

पोस्ट ‘बालिका वधू’ची गहना आता बिझनेसवुमन; ‘शार्क टैंक इंडिया’मध्ये ब्रँडसह घेतली एंट्री वर प्रथम दिसू लागले दैनिक बोंबाबोंब.
Recover your password.
A password will be e-mailed to you.

‘बालिका वधू’ या गाजलेल्या मालिकेत गहना या भूमिकेसाठी ओळखली जाणारी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री नेहा मार्दा लवकरच ‘शार्क टँक इंडिया’ सीझन 5मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तिने पहिल्यांदाच नॅशनल टेलिव्हिजनवर प्रेग्नन्सीनंतर आत्मविश्वास कसा ढासळला आणि बाळाच्या जन्मानंतर बॉडी ओडरची समस्या कशी जाणवू लागली, याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
अलीकडेच उद्योजिका बनलेल्या नेहाने (Neha)आपल्या ‘फिटकू’ या पर्सनल केअर ब्रँडसाठी पिच केली. ‘फिटकू’ हा फिटकरीवर आधारित अंडरआर्म रोल-ऑन असून, नैसर्गिक घटकांपासून बनवलेला असल्याचा दावा करण्यात आला आहे. पिचदरम्यान नेहाने आपल्या ब्रँडची वैशिष्ट्ये सांगितली, मात्र शार्क्सच्या प्रश्नांनी तिला काहीशी अडचणीत टाकलं.
नेहाने सांगितलं, “प्रेग्नन्सीनंतर मला बॉडी ओडरची समस्या जाणवू लागली. एक अभिनेत्री म्हणून त्या दिवशी माझा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला होता. त्यावर कोणताही उपाय काम करत नव्हता. जी गोष्ट वैयक्तिक समस्येपासून सुरू झाली, तीच पुढे एक बिझनेस आयडिया बनली.”
अनुपम मित्तल यांनी प्रॉडक्टच्या सुगंधाबाबत प्रश्न उपस्थित करत विचारलं, “या सुगंधाचा नेमका अर्थ काय? की तो फक्त एक दिखावा आहे?” कारण हा रोल-ऑन 100 टक्के नैसर्गिक असून 24 तास ताजेपणा देतो, असा दावा केला जातो.
दरम्यान, नमिता थापर यांनी किंमतीवर आक्षेप घेत म्हणाल्या, “200 रुपयांत डिओ मिळतो, 100 रुपयांतही पर्याय आहेत. तुमचा प्रॉडक्ट 999 रुपयांचा आहे. भारतीय ग्राहक याच्याशी रिलेट करू शकतील का?”
याशिवाय, पॅनलने नेहाच्या सेलिब्रिटी स्टेटसवरही प्रश्न उपस्थित केला. टीव्ही स्टार म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीचा ब्रँडच्या मार्केटिंग आणि विक्रीवर नेमका किती परिणाम झाला, याबाबतही शार्क्सनी स्पष्ट विचारणा केली.
या सीझनमध्ये अमन गुप्ता, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनीता सिंह, रितेश अग्रवाल, कुणाल बहल आणि विराज बहल यांच्यासह अमित जैन जज म्हणून पुनरागमन करत आहेत. याशिवाय, मिनिमलिस्टचे मोहित यादव, जेटसेटगोच्या कनिका टेकरीवाल, फिक्सडर्माची फाउंडर शैली मेहरोत्रा, तसेच हार्दिक कोठिया आणि वरुण अलाघ यांचीही पॅनलमध्ये एंट्री झाली आहे.
नेहा मार्दाचा हा प्रवास वैयक्तिक संघर्षातून उद्योजकतेपर्यंतचा असल्याने, तिचा हा एपिसोड प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पोस्ट ‘बालिका वधू’ची गहना आता बिझनेसवुमन; ‘शार्क टैंक इंडिया’मध्ये ब्रँडसह घेतली एंट्री वर प्रथम दिसू लागले दैनिक बोंबाबोंब.
Prev Post
Comments are closed.