‘मुझसे शादी करोगी…’ गाण्यावर थिरकला निक जोनस, देसी गर्लसाठी दाखवलं प्रेम; युजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया – Tezzbuzz
प्रियांका चोप्राचा पती,प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनास सध्या बॉलिवूड गाण्यांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेला दिसत आहे. प्रियांकाशी लग्न झाल्यानंतर निकचा भारतीय संस्कृतीकडे, विशेषतः हिंदी गाण्यांकडे असलेला ओढा सतत वाढताना पाहायला मिळतो. तो अनेकदा बॉलिवूड गाण्यांवर नाचताना किंवा ती गाणी एन्जॉय करताना दिसतो आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
बुधवारी निक जोनासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या बँडमेट्स आणि भावासोबत प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra)चित्रपट ‘मुझसे शादी करोगे’ या सिनेमाच्या टायटल ट्रॅकवर धमाल करताना दिसतो. या गाण्यावर निकने केलेल्या भन्नाट डान्स स्टेप्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा उत्साह आणि एक्सप्रेशन्स पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले, तर काहींनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, “मी पूर्णपणे सहमत आहे निक! पंजाबी आणि हिंदी म्युझिकची एकदा सवय लागली की सुटतच नाही.” तर दुसऱ्या एका भारतीय युजरने गंमतीशीरपणे लिहिले, “काश त्यांना गाण्याचे बोल समजले असते, तर त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची रांग लागली असती.” आणखी एका युजरने कमेंट करत म्हटले, “हे सगळे अगदी भारतीय काकांसारखे नाचत आहेत,” ज्यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले.
निक जोनास याआधीही अनेक वेळा बॉलिवूड गाण्यांवर नाचताना दिसला आहे. प्रियांकासोबतच्या लग्नानंतर त्याने भारतीय सण, परंपरा आणि संगीत खुलेपणाने स्वीकारले आहे. चाहत्यांना त्याचा हा देसी अंदाज खूपच आवडतो. निक आणि प्रियांकाची जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते आणि असा हलका-फुलका, मजेशीर व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांसाठी खास ट्रीट ठरत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
-16 डिग्री थंडीत शूटिंग, पातळ टी-शर्टमध्ये थरथर कापला अभिनेता; जीभही गोठली, न्योमामधला थरारक अनुभव
Comments are closed.