मिडल ईस्ट तणावावरून ट्रोल करणाऱ्यांना नोराने सुनावलं; म्हणाली, “लोकं समजून घेणं आणि ऐकणं विसरलं आहेत” – Tezzbuzz
मिडल ईस्टमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिने सोशल मीडियावर ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शांतता आणि एकतेचा संदेश दिल्यामुळे तिला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, नोरा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं तिनं स्पष्ट केलं.
अलीकडेच मिडल ईस्टमधील परिस्थितीवर बोलताना नोराने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आणि सध्याच्या कठीण काळात सर्वांनी शांतता आणि एकता जपावी, असं आवाहन केलं. मात्र काही सोशल मीडिया युजर्सना तिचं हे मत पटले नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
यानंतर नोराने आणखी एक व्हिडिओ आणि स्टोरी शेअर करत ट्रोलर्सना सुनावलं. बुधवारी तिने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर या विषयावर भाष्य केलं. “असं वाटतं की अनेक लोकांनी समजून घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता गमावली आहे. शाळेत आपल्याला वाचन, ऐकणं, समजून घेणं आणि चिकित्सक विचार करण्याची शिकवण दिली जाते. पण सोशल मीडियाच्या युगात अनेक जण हे सगळं विसरले आहेत,”असं ती म्हणाली.
तिनं पुढे सांगितलं की,“मी नेहमीच जागतिक शांतता आणि एकतेच्या बाजूने उभी आहे. शांततेबद्दल बोलल्यामुळेही काही लोक नाराज होतात, हे पाहून आश्चर्य वाटतं. समाजासाठी हे अजिबात चांगलं नाही. कोणतीही गोष्ट मला घाबरवू शकत नाही. मी कायम शांततेच्या मार्गावरच राहणार आहे.” नोरा फतेहीच्या या भूमिकेला तिच्या चाहत्यांकडून पाठिंबा मिळत असून सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अभिजीत भट्टाचार्यचा मुलगा दुबईत अडकला; गायकाने मागितली सरकारची मदत
Comments are closed.